Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका! तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना सल्ला; भेसळ करणाऱ्यांना कारवाईचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 November 2026, 12:50

मुंबई : सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. दुकानातून मिळणाऱ्या सुट्या दुधाची साठवणूक आणि वाहतूक योग्य पद्धतीने होते की नाही, याची खात्री नसते. त्यामुळे सीलबंद पिशवीतील पाश्चराइज्ड दूध खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यामागील कारणे स्पष्ट केली.

तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून थेट कच्चे दूध घेणे आणि दुकानातून सुटे दूध खरेदी करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्यांकडून कच्चे दूध घेत असाल तर ते घेऊ शकता; मात्र दुकानातून सुटे दूध खरेदी करणे टाळावे.

पाश्चराइज्ड दूध खरेदी करताना ते सीलबंद पिशवी किंवा पॅकेटमध्येच घ्यावे. तसेच पॅकेटवरील उत्पादन तारीख आणि एक्स्पायरी डेट तपासून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

दूध घरापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याची साठवणूक आणि वाहतूक कशा पद्धतीने केली जाते, याबाबत ग्राहकांना माहिती नसते. दुकानातील फ्रिजमध्ये आवश्यक तापमान राखले जाते की नाही, तसेच सुटे दूध वाहून आणणारा टँकर स्वच्छ आहे की नाही, याची खात्री देता येत नाही.

दुधाचे तापमान ४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसावे, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. गाई किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर ते दोन तासांपेक्षा जास्त वेळ सामान्य तापमानात उघड्यावर ठेवल्यास त्यामध्ये आम्लता वाढवणारे घटक निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

तूप, लोणी आणि वनस्पती तेलामध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी विक्रेत्यांना दिला. कोणताही ठोस आधार नसताना ‘शुद्ध देसी तूप’ किंवा ‘शुद्ध दूध’ असे दावे करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘शुद्ध तूप’ किंवा ‘१०० टक्के प्युअर’ अशा दाव्यांकडे ग्राहकांनी सावधपणे पाहावे. अशा प्रकारचे दावे करून तूप किंवा दूध विकले जात असल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी. संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे आवाहन त्यांनी केले.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या साठवणुकीपासून विक्रीपर्यंत स्वच्छता आणि योग्य तापमान राखणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

अपघाताचा बनाव रचून जावयाचा खून! आजे सासऱ्यासह सासऱ्याला अटक, लोणीकंद पोलिसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp