अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर येथील कांदा विक्रेता ट्रेडरची ८ लाख तेवीस हजार 224 रुपयाचा कांद्याचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मच्छिंद्र लक्ष्मण रोडे वय 45 वर्षे व्यवसाय बजरंग ट्रेडिंग कंपनी कांदा मार्केट शिरूर रा- भांबर्डे ता-शिरूर जि-पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शिरूर येथील कांदा मार्केट मधून (ता. शिरूर जि. पुणे) येथुन हरियाना गुड्स कॅरीयर्स सावरगाव येवला (जि. नाशिक) प्रो. प्रा. पवनकुमार शर्मा यांनी पाठविलेली ट्रक. नं. एच आर 73]9756 व चालक इसाक खान. त्यांनी विश्वासाने भरलेला कांदयाच्या 476 पिशव्या 25495 कीलो ग्रॅम वजनाच्या 8, 23,224 रु रूपयेचा माल रावल ट्रेडिंग कंपनी गुडगाव हरियाना राज्य या ठिकाणी पोहोच करण्याकरीता दिला असता.
तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा अपहार करून रोडे यांची आर्थिक फसवणूक केली असून पवनकुमार शर्मा, चालक इसाक खान या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जगताप हे करीत आहेत.