बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर हवेलीमध्ये जिरवा जिरविला सुरुवात झाली आहे. एक दिवसाआड प्रचारामुळे कार्यकर्ते संभ्रमात, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे सख्य सर्वांना माहीत आहे. सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विजय शिवतारे यांची गोची झाली. त्यानंतर लोकसभेमध्ये दोघांचे सूत जुळले, परंतु अजित पवार यांनी शिवतारे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे नियोजन केले असल्याची चर्चा पुरंदर हवेलीमध्ये सुरू झाली आहे. विजय शिवतारे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली असताना देखील अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पुन्हा दोघांमध्ये जुनाच जिरवा जिरवीचा वाद नव्याने सुरू झाला आहे.
त्यातच एक दिवसाआड शिवतारे यांचा प्रचार सुरू असल्याचेही कार्यकर्ते संभ्रमात असून, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याची चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकी वेळी विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले केले होते. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या शब्दाची आठवण करून देत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शडू ठोकला होता. याशिवाय अजित पवारांचा बदला घेणार अशी स्पष्ट केले होते. तसेच त्यांना महादेवाच्या पिंडीवरील विंचू देखील म्हटले होते. विजय शिवतारे यांनी महायुतीमध्ये असूनही अजित पवार यांच्या विरोधात कुरघोडी करण्यास कोठेही कसूर सोडलेली नाही. याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीने संभाजी झेंडे यांना रिंगणात उतरवल्याची चर्चाही पुरंदर हवेलीमध्ये सुरु आहे.
एकही प्रकल्प पूर्ण नाही महायुती शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री राहिलेले विजय शिवतारे हे आमदार संजय जगताप यांना आव्हान देणार आहेत. पुढे अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली त्यामुळे पुन्हा एकदा दोघांमध्ये जुनाच जिरवा जिरवीचा वाद नव्याने सुरू झाला आहे .सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असलेल्या शिवतारे यांच्यासाठी ही निवडणूक अजिबात फारशी सोपी नाही. शिवतारे यांच्याकडून गुंजवणीचे पाणी, विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार ,आमदारांची अकार्यक्षमता आदी मुद्दे प्रभावीपणे मांडले जात आहेत. यातील एकही प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात त्यांना पूर्ण करता आला नाही. गेल्या दोन निवडणुकीत गाजलेला गुंजवणी प्रकल्पाला सही राहिली होती मग त्या खात्याचे मंत्री होता, तेव्हा कुठे घोडे अडले होते. चार ते पाच मुद्दे घेऊनच पुरंदर विधानसभा निवडणूक संदर्भात मुद्दा घेऊनच शिवतारे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
विमानतळाचा मुद्दा सुद्धा सात बाधित गावातच करणार असल्याचे स्पष्ट सांगत आहेत. सात गावातील ठिकाणी करण्याचा विमानतळ मुद्दा त्यांनी आत्तासुद्धा लावून धरलेला आहे. यावेळी मात्र या मुद्द्यांचा प्रभाव ओसरल्याचे पूर्णपणे पुरंदर हवेली मध्ये दिसून येत आहेच. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आणि राष्ट्रीय बाजार हे दोन मुद्दे देखील शिवतारे यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा त्यांना कितपत होणार हे सांगणे सध्या तरी कठीण होऊन गेले आहे.
आत्ता सध्या तरी एअर बलूनच्या संदर्भात विजय शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, दुसरे त्या ठिकाणी पत्रकारांना सुद्धा दमदाटी करण्याचे काम त्यांच्याकडून चालू आहे. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. 2019 ला आघाडीचे पालन करीत ते थांबले होते. 2024 ला तिकीट मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने झेंडे यांनी नाराजी व्यक्त करत, थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळवत अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण? असा पेच निर्माण झाला आहे.
परंतु महायुतीचे दोन उमेदवार असल्यामुळे व महाविकास आघाडीचा एक उमेदवार असल्यामुळे खरी लढत या ठिकाणी पुरंदर हवेलीमध्ये दिसून येत आहे. खरी लढत पुरंदर हवेलीमध्ये संजय जगताप व संभाजी झेंडे यांच्यातच पहायला मिळत आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विजय शिवतारे असल्याचेही दिसून येत आहे. महायुतीच्या दोन उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार संजय जगताप यांनाच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची मतांची विभागणी ही पुरंदर हवेली मध्ये होताना दिसून येत आहे. याचा फायदा हा फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना होणार असल्याचे स्पष्ट मत पुरंदर हवेली मध्ये दिसून येत आहे.