Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील मॉडेल कॉलनीत निवृत्त पोलीस निरीक्षकाचा धिंगाणा? महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 November 2026, 11:37

पुणे, ता. 23 : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याविरुद्धच महिला रहिवाशाचा विनयभंग केल्याचा, तिच्या पतीला मारहाण केल्याचा आणि धमकावल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरात जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची तक्रार संबंधित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. अभय परमार असे संबंधित निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. भरदिवसा सोसायटीच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे मॉडेल कॉलनीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 48 वर्षीय विवाहितेने 22 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका बँकेत गेल्या 20 वर्षांपासून नोकरी करतात. रविवारी (ता. 22) दुपारी बाराच्या सुमारास सोसायटीच्या वॉचमनचा त्यांच्या पतींना फोन आला. चारचाकी गाडी धुण्यासाठी इमारतीच्या पाठीमागे आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांचे पती गाडी घेऊन इमारतीच्या मागील बाजूस गेले. त्यावेळी सोसायटीत राहणारे अभय परमार हे त्यांच्या पतीच्या गाडीजवळ गेले आणि त्यांना खाली बोलावले. गाडीतून खाली उतरत असतानाच जुन्या भांडणाचा राग मनात धरून परमार यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्यावर आणि शरीरावर हाताने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

पतीला मारहाण होत असल्याचे समजताच, फिर्यादीआणि त्यांची मुलगी या घटनास्थळी धावल्या. मात्र, त्यानंतरही वाद थांबण्याऐवजी अधिकच चिघळला. परमार यांनी उपस्थित नागरिकांसमोर फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ‘तुमच्याकडे बघून घेऊ,’ अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून गेले. या प्रकारामुळे आपल्याला मानसिक त्रास झाला तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना सोसायटीतील हेमंत दाभाडे यांनी तत्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनास्थळी बोलावले. याचवेळी अभय परमार यांनी दाभाडे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यापूर्वीही परमार यांनी कोणतेही कारण नसताना आपल्याला आणि कुटुंबीयांना शिवीगाळ केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतरही निलंबनाची कारवाई

दरम्यान, अभय परमार यांच्या पोलीस खात्यातील पूर्वीच्या कारकिर्दीची पार्श्वभूमीही या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. एप्रिल 2018 मध्ये अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना केडगाव येथे शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. शिवसेनेने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप केल्यानंतर तत्कालीन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाने परमार यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांची नियुक्ती करण्यात आली होती. केडगाव हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. या घटनेनंतर आता पुण्यातील मॉडेल कॉलनीत मारहाण, विनयभंग आणि धमकावल्याचे आरोप समोर आल्याने परमार यांच्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

निवृत्त अधिकारी असो वा सामान्य नागरिक, कायदा सर्वांसाठी समान!

मॉडेल कॉलनीतील या घटनेमुळे सोसायटी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला रहिवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांना झालेल्या कथित त्रासाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी, तक्रारीची निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तक्रारदार कुटुंबावर कोणताही दबाव येऊ नये, यासाठीही पोलिसांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पोलीस दलात वरिष्ठ पदावर काम केलेली व्यक्ती असो किंवा सामान्य नागरिक, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हिंजवडीत प्रेमाचा भयानक शेवट! 3.5 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून; धक्कादायक कारण आलं समोर

Tuesday, 24 November 2026, 10:13

मुंबई-पुणे महामार्गावर AI ची नजर! खड्डे आणि अपघातप्रवण ठिकाणे शोधणार तंत्रज्ञान

Tuesday, 24 November 2026, 9:50

पुण्यात आरटीओने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांचे आंदोलन तूर्तास स्थगित…

Tuesday, 24 November 2026, 9:06

पुण्यातील कॉस्मेटिक्स दुकानात FDA चा छापा! क्रीम आणि हेअर ऑईलसह 7.30 लाखांचा माल जप्त

Tuesday, 24 November 2026, 8:54

मुंबईकरांनो, अलिबाग आता फक्त 45 मिनिटांवर! समुद्रावर उभा राहणार 3,500 कोटींचा भव्य पूल

Tuesday, 24 November 2026, 8:47

सोन्या-चांदीचा तोरा पुन्हा वाढला! घसरण थांबली, आता दरांनी घेतली जोरदार उसळी

Tuesday, 24 November 2026, 8:37
Next Post

गुन्हेगारीला थारा नाही, कायदा मोडणाऱ्यांची गय करणार नाही; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा कोरेगाव भीमा येथे संयुक्त बैठकीत इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp