युनूस तांबोळी
पुणे : जागतिक तापमान वाढीमुळे प्रदुषण, ढगफुटी अवकाळी पाऊस, गारपिट आणि निसर्गाचा कोप यामुळे मानवसृष्टी धोक्यात आली आहे. गावाच्या हद्दीत जर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन केले गेले तर नैसर्गीक आपत्ती चे धोके टाळू शकतो. यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने वृक्षारोपन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अशी माहिती पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी दिली. कवठे येमाई ( ता. शिरूर ) महावितरणचे विज उपकेंद्र जवळ साडे बावीस एकर सरकारी गायरान जमिनीत विविध प्रकारच्या सुमारे ५० हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच बबनराव पोकळे, उपसरपंच उत्तमराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे, मिठूलाल बाफना, सोसायटीचे चेअरमन हौशीराम मुखेकर, बबुशा पाटील कांदळकर, अंजनाबाई पोकळे, राधाबाई मुखेकर, कांताबाई मुखेकर, लताबाई हिलाळ, सुनीता मुखेकर किसन हिलाळ, दत्तात्रय पडवळ, अंकुश कवठेकर, एकनाथ सांडभोर, विठ्ठल घोडे, बबनराव वागदरे, मारुती वागदरे, दिनेश पोळ, बाळासाहेब इचके, मारुती इचके, वृद्ध महिला, जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या सरकारी गायरान माळरानावर लावण्यात आलेल्या या वृक्षांच्या संगोपनाचे काम संकल्प तरू फाउंडेशन यांना देण्यात आले आहे. लागवड करण्यात आलेल्या सर्व झाडांची पूर्ण देखभाल व संगोपनाचे सहा वर्षे करण्यात येणार आहे.
असल्याचे सरपंच सुनिता पोकळे यांनी सांगितले.
दरम्यान, झाडे लावण्यापेक्षा त्यांचे संगोपन महत्वाचे आहेत. त्यामुळे या वृक्षारोपनासाठी महत्वाची काळजी घेण्यात आली आहे. या बरोबर ग्रामपंचायतच्या मार्फत लावण्यात आलेल्या झाडांची काळजी ग्रामस्थांनी घ्यावी. वृक्षरोपनातून ऑक्सिजन मिळेल तर ग्लोबल वार्मींग चे धोके दुर होण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. असे आवाहन पोकळे यांनी केले.