पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. गुरुवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
1987 मध्ये दत्तवाडी-राजेंद्रनगरमधून ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडले गेले. त्यानंतर 1992-1997 कालावधीत गणेशखिंड भागातून नगरसेवक पद भूषविले.
1999 मध्ये ते पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविले. भाजपा शहराध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे काम पुणे शहरात तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले.