Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; महाराष्ट्र पोलिसांची मानवंदना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 June 2026, 13:45

इम्रान अत्तार

भोर: भोरचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि सहा वेळा आमदार राहिलेले अनंतराव थोपटे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला. राज्याच्या राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. अनंतराव थोपटे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

अंत्ययात्रेदरम्यान ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामघोष आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. बंदुकींच्या फैरी आणि शोकधून वाजवत पोलिसांनी आपल्या आदरांजली अर्पण केली.

 

अनंतराव थोपटे यांनी भोर मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व करत शिक्षण, सहकार आणि ग्रामीण विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लागली. साधी राहणी, लोकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध आणि काँग्रेस विचारधारेप्रती असलेली निष्ठा यामुळे ते जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले.

अंत्यसंस्कारावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनाने भोर तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक मोठे पर्व संपल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कानिफनाथ घाटात तरुण-तरुणींना लुटणाऱ्या 3 दरोडेखोरांना अवघ्या 12 तासांच्या आत बेड्या; फुरसुंगी पोलिसांची कामगिरी..

Wednesday, 17 June 2026, 16:10

राजकारण तापले! ठाकरेंकडे आता केवळ 3 खासदार; ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

Wednesday, 17 June 2026, 15:53

संजय देशमुख ‘कॅप्टन’, तर आष्टीकर ‘व्हाइस कॅप्टन’; ओमराजेंना ‘त्या’ हत्या प्रकरणातील निकालाचे आश्वासन? सुषमा अंधारेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Wednesday, 17 June 2026, 15:37

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून खलबतं! बैठकीत मोठा निर्णय, ठोंबरेंना डावलून पुण्यातल्या ‘या’ महिला नेत्याची नियुक्ती…

Wednesday, 17 June 2026, 15:01
Operation Tiger: Rebel MPs were taken to an undisclosed location; Amit Shah made a single phone call, giving the green signal to 'Operation Tiger'—what exactly happened?

Operation Tiger: बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी नेलं, अमित शहांनी एक फोन केला अन् ऑपरेशन टायगरला ग्रिन सिग्नल मिळाला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 17 June 2026, 14:29

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Wednesday, 17 June 2026, 13:42
Next Post

पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात 'मेड इन पाकिस्तान' चादरींची विक्री; भाविकांनी व्यक्त केला संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.