अरुण भोई
राजेगाव : पोलीस सेवेत येण्यासाठी लाखो युवकांची धडपड चालू असते. ही भरती कस लावणारी असते. यामध्ये प्रतिभावंत आणि प्रामाणिक कष्ट घेणाऱ्या युवकांनाच यश मिळते. कधीकधी यश उशिरा मिळते. माणूस हवालदिल होतो आणि शॉर्टकट शोधू लागतो. हा शॉर्टकट कधीकधी लांबीचा ठरू शकतो. त्यामुळे मेहनतीशी प्रामाणिक राहा. भरती झालो की कष्ट संपले असे नसून सेवेत रुजू झाल्यानंतर खरी मेहनत सुरू होते. त्यामुळे निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त जरूर करावा परंतु गावकऱ्यांना अभिमान वाटेल असे कार्य हातून घडेल याबाबत जागृत राहावे असे प्रतिपादन राजेगांवचे पोलीस पाटील महेश लोंढे यांनी केले. यावेळी सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदीप भोसले,सरपंच राजेश राऊत, राजेंद्र कदम, यांनीही मनोगत व्यक्त केले.
राजेगाव येथील पोलीस एसआरपीमध्ये पदी विशाल शशिकांत राऊत सुमित सुखदेव भोसले व तलाठी पदी केदार बाळासाहेब दळवी यांची निवड झाली आहे. नगर परिषद दुय्यम अधिकारी अविनाश प्रकाश जाधव, या विद्यार्थ्यांनी ही मनोगत व्यक्त केले. राजेगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने शनिवारी सत्कार समारंभ आयोजित केला होता. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी यावेळी सरपंच सोपान चोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष शहाजी गुणवरे, माजी सरपंच दत्ता मोघे, ग्रामपंचायत सदस्य सतीश खैरे, मा उपसरपंच विलास चोपडे, बाळासाहेब दळवी, ओंकार लोंढे, गणेश जाधव, अशोक कदम, सचिन जाधव, अंकुश मेरुकर, ऋषिकेश नागवे, सागर दळवी, योगेश वाघमारे व ग्रामस्थ उपस्थित होते.