Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दोन तरुण गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 June 2026, 16:16

लोणी काळभोर, ता. ८ : जुन्या वादाचा राग मनात धरून “तू आदित्य मुसळेसोबत भांडण का केले?” असा जाब विचारत एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मांजरी बुद्रुक परिसरात घडली आहे. या हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी आरोपींसह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विशाल हनुमंत सोनवणे (वय २४, रा. कुंजीरवस्ती, मांजरी बुद्रुक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेम परकाळे, धैर्यशील आखाडे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सोनवणे हे ओला-उबरवर रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. शनिवारी (ता. ६) रात्री सुमारे नऊच्या सुमारास विशाल आणि त्यांचा मित्र यश भगत हे अ‍ॅक्टिव्हा दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी मांजरी-हडपसर रस्त्यावरील रंगीचा ओढा येथील समर्थ पेट्रोल पंपावर गेले होते.

पेट्रोल भरून दोघे निघत असताना तेथे प्रेम परकाळे, धैर्यशील आखाडे आणि त्यांचे काही साथीदार आले. “तू आदित्य मुसळेसोबत भांडण का केले?” असा जाब विचारत त्यांनी विशाल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धैर्यशील आखाडे व इतरांनी विशाल यांना मारहाण केली. दरम्यान, प्रेम परकाळे याने हातातील धारदार शस्त्राने विशाल सोनवणे यांच्या डाव्या मनगटावर वार केला. विशाल यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या यश भगत यांच्या डाव्या हाताच्या बोटावरही त्याच शस्त्राने वार करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.

 

जखमी अवस्थेत विशाल सोनवणे यांनी मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी पाठविले असून सध्या दोघांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(2), 352, 3(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 25(4) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12
Next Post

'इन्शुरन्स पॉलिसी बंद करतो' म्हणत APK फाईल पाठवली; मांजरीतील प्रोडक्शन मॅनेजरची तब्बल ६ लाखांची सायबर फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.