Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘इन्शुरन्स पॉलिसी बंद करतो’ म्हणत APK फाईल पाठवली; मांजरीतील प्रोडक्शन मॅनेजरची तब्बल ६ लाखांची सायबर फसवणूक

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 June 2026, 16:32

लोणी काळभोर, ता. ८ : इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचा बनाव करून एका सायबर चोरट्याने ग्राहकाला APK फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडत त्याच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि तीन वेगवेगळ्या क्रेडिट कार्डमधून तब्बल ६ लाख ३९ हजार १९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण प्रल्हाद उंद्रे (वय ४२, रा. बेल्हेकरवस्ती, मांजरी बुद्रुक) यांनी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उंद्रे हे खासगी कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी उंद्रे यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातील अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्या क्रेडिट कार्डवर इन्शुरन्स पॉलिसी सक्रिय असून त्यासाठी दरमहा ईएमआय भरावा लागेल, असे सांगण्यात आले. त्यावर उंद्रे यांनी अशी कोणतीही पॉलिसी नको असल्याचे सांगितले.

यानंतर आरोपीने पॉलिसी बंद करण्याच्या बहाण्याने व्हॉट्सॲपवर “Indusind credit card.apk” नावाची फाईल पाठवली. संबंधित फाईल डाउनलोड करून कार्डची माहिती भरताच आरोपीने त्यांच्या मोबाईलचा रिमोट अॅक्सेस मिळवला. त्यानंतर कॉल फॉरवर्डिंगची सुविधा सक्रिय करून ओटीपी स्वतःकडे वळवण्यात आले. या माध्यमातून आरोपींनी एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्डवरून विविध व्यवहार करत ६,३९,०१९ रुपयांची रक्कम लंपास केली. ‘शहादत स्टोअर’, ‘फ्रीचार्ज पेमेंट’, ‘रिलायन्स डिजिटल, मुंबई’ तसेच अन्य खात्यांवरून व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

 

फसवणुकीचा संशय आल्यानंतर प्रवीण उंद्रे यांनी तातडीने त्यांच्या रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधून तिन्ही क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. तसेच राष्ट्रीय सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवून सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

नागरिकांसाठी सायबर पोलिसांचा इशारा

-कोणतीही APK फाईल डाउनलोड करू नका.
-बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी कधीही फोनवरून OTP किंवा कार्डची माहिती मागत नाही.
-अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलचे कॉल फॉरवर्डिंग किंवा स्क्रीन शेअरिंग करू नये.
-संशयास्पद व्यवहार झाल्यास त्वरित 1930 हेल्पलाईन किंवा सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09

सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट! घसरणीनंतर अचानक विक्रमी उसळी; आता पुढे काय होणार?

Monday, 6 July 2026, 15:43

तंत्रज्ञानामुळे मोठा अपघात टळला! मिसिंग लिंकवरील दरड दुर्घटनेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पाहणी

Monday, 6 July 2026, 15:42

पँटच्या खिसात हात घातला अन् 12 वर्षीय मुलाला ICU मध्ये केले दाखल; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 6 July 2026, 15:00

दौंड शहरात ओव्हरटेकच्या वादातून चालकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 6 July 2026, 14:32

पालखी तोंडावर, प्रशासन अजूनही झोपेत! पुणे–सोलापूर महामार्गाची दुरवस्था कायम; दोन दिवसांत कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन – सभापती युवराज काकडे

Monday, 6 July 2026, 14:21
Next Post

पुणे-मिरज मार्गावर 21 दिवसांचा मेगाब्लॉक; अनेक रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या वेळेत मोठा बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.