बापू मुळीक
पुरंदर : सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे हे समाजातील मागास घटकांना विविध ठिकाणी सामावून घेवून मुख्य प्रवाहात आणावे आणि जवळपास राज्यात 85 लाखाच्या आसपास असलेल्या समाजाला सामाजिक आणि राजकीय न्याय मिळावा. यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांच्या मागण्या या प्रामुख्याने खालील प्रमाणे आहेत.
1) उपरोक्त विषयानुसार आपल्या मागणीप्रमाणे रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा.
2) राजे उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष हे रामोशी समाजातील असावेत.
3)समाजातील व्यक्तीला विधान परिषदेवर संधी मिळावी.
4) आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक जयंती संसद भवन येथे साजरी करावी.
या उपोषणास आणि या संयुक्तिक मागण्यांसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. याप्रसंगी तालुकाप्रमुख अभिजित जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेडे, बहुजन हक्क परिषदेचे सुनिल धिवार, बहुसंख्येने सदस्य, माजी सरपंच भैय्या खोमणे,मातॅड साठे, नमिता भंडलकर,काजल यरमल, रवि खोमणे,गजानन ढवले, अशोक खोमणे, विठ्ठल रनावरे,लखन चव्हाण, सयाजी बुधावले, नाना पोल,युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी शुभम झिंजुरके, कृष्णा कामठे, साधु दिघे, पत्रकार आदीनी पाठिंबा दिला. यावेळी बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.