Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शेतकऱ्यांना येत्या ३ दिवसांत मदत मिळणार, अधिसूचना काढण्यात येणार’ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 15:48

पुणे, ता. २४ : राज्यात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील पहिली अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री भरणे यांनी देऊळगाव, मोरगाव, मुर्ती, नावळी आणि कोळविहीरे या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची तसेच उपलब्ध पाणी परिस्थितीची पाहणी केली. पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांवर झालेल्या परिणामाची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली.

शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. झालेल्या नुकसानीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे भरणे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याचे भरणे यांनी सांगितले. हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि मुळशी या तालुक्यांमध्ये मागील दोन ते तीन आठवड्यांपासून पावसाचा खंड आहे. भोर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये तीन ते चार आठवड्यांचा खंड नोंदवला गेला आहे. तर बारामती, शिरूर, पुरंदर, इंदापूर, दौंड आणि खेड या तालुक्यांमध्ये चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

दीर्घकाळ पाऊस न झाल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती मदत देण्यासाठी शासनाकडून कार्यवाही सुरू आहे. दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित राहू नये, यासाठी पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबतही नियोजन करण्यात आले आहे.

नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करून त्याआधारे शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यावर शासनाचा भर असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

छगन भुजबळांना मोठा दिलासा! बहुचर्चित खटल्यातून दोषमुक्त, विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp