Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भवरापूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 16 June 2026, 10:57

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन-अष्टापूर राज्य मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत भवरापूर (ता. हवेली) येथील एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 मेला सायंकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार मैदान, सटवाई चौक या ठिकाणी ही घटना घडली.

प्रवीण निवृत्ती साठे (वय-55, रा. भवरापूर साठेवस्ती, ता. हवेली) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत राजकुमार प्रवीण साठे (वय-29, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजकुमार साठे यांचे वडील 28 मे ला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून गोळीबार मैदान परिसरातील शेतात पाण्याच्या मोटारीचे काम करण्यासाठी गेले होते. काम आटोपून सायंकाळी पाऊणे आठच्या सुमारास भवरापूर-अष्टापूर रोडने माघारी निघाले होते. माघारी येत असताना, सटवाई मंदिर चौकाच्या मागे भवरापूर गावच्या हद्दीत एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी कडक होती की, प्रवीण साठे हे गाडीवरून रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला, मानेला तसेच छातीच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी राजकुमार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने वडिलांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारकामी दाखल केले.

दरम्यान, 14 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असताना अखेर गुरुवारी (ता. 11) सकाळी पाऊणे अकरा वाजता उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल रासकर हे करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक-पदवीधरांच्या निकालाची उत्सुकता! राजकीय प्रतिष्ठा पणाला; पक्षीय ताकद, बंडखोरी आणि मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

Tuesday, 27 October 2026, 10:09

मोबाइल नंबर हवा, Instagram-Snapchat आयडीही मागितला; इंदापुरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला अन्…

Tuesday, 27 October 2026, 10:02

पुण्यातील ‘लेडी डॉन’वर MPDA अंतर्गत कारवाई; वारंवार कारवाईनंतरही अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 9:53

पुण्यात बनावट नोटांचा कारखाना? 500 रुपयांच्या नोटांचा खच, 4 जणांना ठोकल्या बेड्या

Tuesday, 27 October 2026, 9:45

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55
Next Post

कोरेगाव मूळ येथील स्विमिंग टँकमध्ये निष्पाप मुलाचा बुडून मृत्यू; मालक, कोचसह आणखी एकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp