Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; एकाला अटक तर 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 November 2026, 20:18

लोणी काळभोर, ता. २२ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड वस्ती परिसरात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू निर्मितीच्या कारखान्यावर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे छापा टाकत कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल 11 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तंबाखू निर्मिती करताना एकाला शनिवारी (ता. 21) अटक केली आहे.

रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २६, रा. लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध तंबाखू निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक दोनचे अधिकारी व कर्मचारी शनिवारी पूर्व प्रादेशिक विभागात गस्त घालत होते. त्यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इनोव्हेरा इंग्लिश स्कूलसमोरील गायकवाड वस्ती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार परेश सावंत आणि पोलीस अंमलदार सचिन कांबळे यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी रोहित गुप्ता हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची निर्मिती करताना आढळून आला. पोलिसांनी कारखान्यातील तयार तंबाखू, उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, पॅकिंग साहित्य, पॅकिंग मशीन तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण 11 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी व तत्सम पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यास बंदी आहे. असे असतानाही कायद्याला धाब्यावर बसवून अवैधरीत्या तंबाखूची निर्मिती आणि विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी रोहित गुप्ता याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274 व 275 अन्वये रविवारी (ता. 22) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानावडे, सहायक फौजदार ज्योतिबा कुरळे, पोलीस हवालदार परेश सावंत, महेश बारवकर तसेच पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे व सचिन कांबळे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खराडीत विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

Sunday, 22 November 2026, 23:10

फुरसुंगीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध

Sunday, 22 November 2026, 21:41

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असतानाही लोणी स्टेशन परिसरात फिरणाऱ्या अट्टल गुन्हेगार फिरोज शेखला अटक

Sunday, 22 November 2026, 20:56

पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; सहा आरोपी जेरबंद, दोन अल्पवयीन ताब्यात

Sunday, 22 November 2026, 20:54

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये FDA ची धडक कारवाई; ९६ खाद्य आस्थापनांची तपासणी, १२ परवाने व नोंदणी निलंबित

Sunday, 22 November 2026, 20:39

LPG गॅस सबसिडी बंद होण्याची भीती दाखवून सायबर फसवणूक; ICICI बँकेचा ग्राहकांना इशारा

Sunday, 22 November 2026, 20:29
Next Post

LPG गॅस सबसिडी बंद होण्याची भीती दाखवून सायबर फसवणूक; ICICI बँकेचा ग्राहकांना इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp