सागर जगदाळे
भिगवण : ग्रामपंचायत चिंचोलीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच पूनम मदने आणि ग्रामसेविका स्वाती लोंढे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवाजी मत्रे, विलास होले, मच्छिंद्र मदने, महमंद शेख, विशाल होले, तुकाराम गोलांडे, अविनाश कांबळे, आरोग्यसेवक सागर शिंदे, कृषीसहायक शंकर कांबळे, विद्यार्थी शंभू घोरपडे, अरबक्ष शेख तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
ग्रामसेविका स्वाती लोंढे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवडीसाठी ५० वडाची रोपे मोफत उपलब्ध करून दिली. त्यांच्या या उपक्रमाचे गावातून स्वागत होत आहे. यावेळी बोलताना सरपंच पूनम मदने म्हणाल्या की, झाडे लावून जगवणे ही काळाची गरज आहे. गावात नव्याने रूजू झालेल्या ग्रामसेविका नवनवीन उपक्रम राबवत असून त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. पुढील वर्षी आम्ही या लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करणार आहोत.
आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्वांना एक आवाहन आहे की, वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्रत्येकाने किमान दहा झाडे लावावीत आणि ती जगवावीत. तसेच वाढदिवसाची गोड आठवण म्हणून झाडे जतन करावीत.
स्वाती लोंढे – ग्रामसेविका, चिंचोली