Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘फर्निचर ऑक्शन’च्या आमिषाला अभियंता बळी; सायबर चोरट्यांनी 13 लाखांना घातला गंडा!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 May 2026, 13:28

फुरसुंगी, ता. २४ : टेलिग्राम ग्रुपवर “फर्निचर ऑक्शन”मध्ये गुंतवणूक करून (Fursungi News) मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका नोकरदाराची तब्बल १३ लाख ७८ हजार ८७६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला छोटा नफा देऊन विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर सायबर भामट्यांनी टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

या प्रकरणी हडपसर येथील रहिवासी व बावधन येथील खासगी कंपनीत नोकरी करणारे सुशांत चंद्रकांत कोरे (वय ३४) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२५ रोजी सुशांत कोरे हे घरी असताना त्यांच्या टेलिग्राम अकाउंटवर “दिप्ती कृष्णा” नावाच्या महिलेने संपर्क साधला. “फर्निचर ऑक्शनमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवायचा आहे का?” असा प्रश्न विचारत तिने कोरे यांना “W Sonoma M6039” या टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड केले.

यानंतर आरोपींनी त्यांना http://www.Williamsonoma-hotfurni.com या वेबसाइटवर प्रोफाइल तयार करून बँक डिटेल्स अपडेट करण्यास सांगितले. वेबसाइटवर फर्निचर खरेदी-विक्री आणि ऑक्शन टास्क पूर्ण केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला कोरे यांनी ११ हजार रुपये ट्रान्सफर केले. काही वेळातच त्यांना १६ हजार रुपये परत मिळाले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी वारंवार संपर्क साधून आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

 

कोरे यांनी विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने लाखो रुपये पाठवले. यामध्ये फेडरल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बंधन बँक, कोटक महिंद्रा, आयडीएफसी फर्स्ट, कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँकेच्या खात्यांचा वापर करण्यात आला. अवघ्या दहा दिवसांत त्यांनी तब्बल १३ लाख ७८ हजार ८७६ रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. वेबसाइटवर त्यांच्या खात्यात सुमारे १८ लाख रुपये दिसत होते. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न करताच विड्रॉल होत नसल्याचे लक्षात आले.

दरम्यान, पैसे अडकत असल्याने कोरे यांनी आरोपींशी संपर्क साधला असता, “तुमचे अकाउंट सक्रिय करण्यासाठी आणखी ६ लाख ११ हजार रुपये भरावे लागतील,” असे सांगण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरून त्यांनी ती रक्कमही भरली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. टेलिग्राम आयडी, वेबसाइट आणि संबंधित व्यक्तींनी संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

टेलिग्राम आयडी आणि अनेक बँक खात्यांचा तपास सुरू

या प्रकरणी “दिप्ती कृष्णा”, “@Anakal-337” या टेलिग्राम आयडीधारकांसह “W Sonoma M6039” ग्रुपचे संचालक, वेबसाइट ऑपरेटर आणि संबंधित बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(D) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ऑनलाईन गुंतवणूक, टेलिग्राम ग्रुप, ट्रेडिंग टास्क, ऑक्शन किंवा “दुप्पट परतावा” देण्याचे आमिष दाखवणाऱ्या लिंक आणि अॅपपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. सुरुवातीला छोटा नफा देऊन विश्वास संपादन करणे आणि नंतर मोठी रक्कम उकळणे ही सायबर भामट्यांची नवी पद्धत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Thrill of torture after love marriage! Married woman strangled, saying 'You are Panauti'; Manjari police station registers case against husband and four others

प्रेमविवाहानंतर छळाचा थरार! ‘तु पनौती आहेस’ म्हणत विवाहितेचा गळा दाबला; मांजरी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.