ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील वाबळेवाडी येथे वीज कनेक्शन नसताना देखील व्यवसायासाठी वर्षभर अनधिकृतपणे वीज चोरी केल्याचे उघड झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अक्षय उत्तम वाबळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर येथील वाबळेवाडी परिसरात विद्युत वितरण विभाग भरारी पथकाचे प्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक कोथळे, सुरक्षा अधिकारी विजय गडसिंग, वरिष्ठ तंत्रज्ञविनोद देवणे, जयकुमार गावडे यांसह आदी वीज कनेक्शनची पाहणी करत असताना अक्षय वाबळे यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी कोणतेही वीज कनेक्शन नसताना वीज पुरवठा सुरु असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान चौकशी केली असता अक्षय वाबळे यांनी वर्षभरापासून अनधिकृतपणे विजेचा वापर केल्याचे उघड झाले. विद्युत महावितरण विभाग भरारी पथकाने तेथील केबल जप्त करत घटनास्थळी पंचनामा केला असून याबाबत विद्युत वितरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक श्रीमंतराव कोथळे वय ५१ वर्षे रा. सायली सुगंध सोसायटी ता. बारामती जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अक्षय उत्तम वाबळे रा. वाबळेवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.