Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बनावट पोलिसाचा सोंग घेऊन ज्येष्ठ शेतकऱ्याला गंडा; शेवाळवाडीत सुमारे १० लाखांचे दागिने लंपास

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 16 June 2026, 17:47

लोणी काळभोर, ता. १६ : शेवाळवाडी (ता. हवेली) परिसरात बनावट पोलिसाचा आव आणत दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ शेतकऱ्याची चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे १० लाखांच्या रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना १४ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. “परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत, दागिने घालू नका,” असा बहाणा करत विश्वास संपादन करून आरोपींनी दागिने घेऊन पोबारा केला.

विश्वनाथ गोविंदराव शेवाळे (वय ७१, रा. शेवाळवाडी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांच्या विरोधात मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ शेवाळे हे पुरातन महादेव मंदिराजवळील त्यांच्या शेत व नर्सरीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येऊन स्वतःला पोलीस असल्याचे सांगत सिव्हिल ड्रेसमध्ये तपासासाठी आल्याचा बनाव केला. त्याने ओळखपत्रही दाखवून परिसरातील एका कापड दुकानातील चोरीच्या प्रकरणातील संशयित व्यक्तीबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

 

दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीलाही त्याने बोलावून “परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे गळ्यातील दागिने काढून ठेवा,” असा सल्ला दिला. त्या व्यक्तीने त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःचे दागिने रुमालात बांधून दिले. त्यानंतर बनावट पोलिसाने विश्वनाथ शेवाळे यांनाही तसेच करण्यास सांगितले.

शेवाळे यांनी गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांचा सोन्याचा गोफ तसेच प्रत्येकी दीड तोळ्यांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून दिल्या. मात्र, दागिने रुमालात बांधल्यानंतर आरोपीने ते परत न देता स्वतःच्या खिशात ठेवले आणि सोबतच्या साथीदारासह दुचाकीवरून क्षणार्धात पसार झाला. या प्रकारात सुमारे १० लाख रुपयांचे दागिने लंपास झाले आहेत. चोरीस गेलेल्या ऐवजात पाच तोळ्यांची सोन्याची चैन आणि दोन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी अंगाने मजबूत व गोल चेहऱ्याचा असून त्याने शर्ट-पँट परिधान केली होती. तर त्याचा साथीदार अंगाने सडपातळ असून त्याने पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घातली होती. दोन्ही संशयितांना पुन्हा पाहिल्यास ओळखू शकत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बनावट पोलीस बनून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी मांजरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50

सासवड पोलिसांची धडक कारवाई! ऑस्करवाडीतील बेकायदा हुक्का बारवर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 17:46

भाड्याच्या घरात दोन थेरड्यांचं धक्कादायक कृत्य! तरुणींना फूस लावून आणायचे अन् शरीराचे लचके तोडायचे; शेजारचे तरुणीला वाचवायला धावले अन्…

Monday, 22 June 2026, 17:04

पुणे सोलापूर महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

Monday, 22 June 2026, 16:37

उच्च न्यायालयाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली; हवेली तालुक्यात बंदी असतानाही फिरणाऱ्या शिंदवणे येथील आरोपीला बेड्या..

Monday, 22 June 2026, 16:32

पुणेकरांनो, उद्यापासून भिडे पूल बंद! प्रवासाचे नियोजन बदलले, वाचा हे पर्यायी मार्ग

Monday, 22 June 2026, 16:20
Next Post

कर्करोग बरा करण्याचा दावा? कोंढव्यातील 'चमत्कारी' धर्मगुरूचा पर्दाफाश; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.