Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्करोग बरा करण्याचा दावा? कोंढव्यातील ‘चमत्कारी’ धर्मगुरूचा पर्दाफाश; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 June 2026, 18:13

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातील एका प्रार्थनास्थळात प्रार्थनेद्वारे कर्करोग, ट्यूमर यांसारखे गंभीर आजार बरे करण्याचा दावा केल्याप्रकरणी एका धर्मगुरुसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील एका महिला कार्यकर्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 32 वर्षीय महिला येरवडा परिसरात राहतात. त्या आणि त्यांची एक मैत्रीण रविवारी, 14 जून रोजी संबंधित प्रार्थनास्थळी गेल्या होत्या. तेथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी 20 रुपये घेऊन त्यांना प्लास्टिकच्या बाटलीत पाणी दिले. तसेच हे पाणी शरीराच्या आजारी भागावर लावल्यास आजार कमी होईल, असे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर धर्मगुरूंनी सभेत उपस्थितांना संबोधित करताना विविध आजारांवर प्रार्थनेद्वारे उपचार होऊ शकतात, असा दावा केल्याचे म्हटले आहे. शरीराच्या ज्या भागात आजार असेल त्या भागावर उजवा हात ठेवावा आणि देवाच्या कृपेने कर्करोग, ट्यूमर यांसारखे विकारही दूर होतील, असे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

दरम्यान, तक्रारदार महिला आणि त्यांच्या मैत्रिणीने या कार्यक्रमाचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र, तेथील काही महिला स्वयंसेवकांनी त्यांना चित्रीकरण करण्यास विरोध केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याशी धक्काबुक्की करून मोबाईलमधील व्हिडिओ हटविण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी धर्मगुरुसह 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले करत आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील दुकानदारावर बनावट माल विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 31 July 2026, 10:43

रखडलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त? ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी बातमी

Friday, 31 July 2026, 10:37

राष्ट्रवादी NDAच्या वाटेवर? जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची पोस्ट व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 31 July 2026, 10:32

20 कोटींचा सिनेमा अन् पडद्यामागची कथा! ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनावर बनणार चित्रपट

Friday, 31 July 2026, 10:05

E20 पेट्रोलचा गाड्यांवर परिणाम! मायलेज 6% पर्यंत घटू शकते; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

Friday, 31 July 2026, 9:20

आधी तडे गेले, मग भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू

Friday, 31 July 2026, 9:06
Next Post

सराईत गुन्हेगाराच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका; शुभम धुमाळला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.