Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी तडे गेले, मग भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 31 July 2026, 9:06

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली गंगाराम वाडी परिसरात गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. कोहिनूर अपार्टमेंट नावाची 4 मजली धोकादायक इमारत रात्री साडे 11 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू केल्यानंतर आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच इतर अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने बचाव पथकांना सुरुवातीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. घटनास्थळी जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी इमारतीच्या प्रवेशाजवळ असलेली जुनी चाळ जेसीबीच्या मदतीने हटवण्यात आली. त्यानंतर बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचू शकली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत 2007 मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये दोन विंग असून एकूण 30 खोल्या होत्या. मात्र, बांधकामातील त्रुटींमुळे ही इमारत काही काळापासून धोकादायक घोषित करण्यात आली होती.

 

इमारतीच्या एका भागातील तळमजल्यावरील काही पिलर खराब झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळपासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. रात्री 8 वाजता इमारत झुकत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून इमारत रिकामी केली होती. मात्र, त्यानंतरही काही लोक सामान घेण्यासाठी इमारतीत परत गेल्याची माहिती समोर आली आहे. याच काळात इमारत कोसळल्याने काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता निर्माण झाली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दुर्घटनेपूर्वी इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, 30 ते 40 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘अति तिथे माती’ लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एपीआय ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात! ‘आणखी दोन कर्मचारी बाबरचेच चेले?’

Wednesday, 9 September 2026, 11:52

आधी दबाव, धमक्या अन् कबुलीचा व्हिडिओ? 19 वर्षीय सृष्टीच्या मृत्यूनंतर रेक्टरला अटक

Wednesday, 9 September 2026, 11:45

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

Wednesday, 9 September 2026, 11:18

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 9 September 2026, 11:13

आई-वडिलांनी सोडलं, पण महाराष्ट्राने नाही! भंडारा डोंगरावर सोडलेल्या चिमुकलीसाठी 300 ते 400 कुटुंबे सरसावली

Wednesday, 9 September 2026, 11:07

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार, पण ‘या’ महिलांचा लाभ बंद होणार?

Wednesday, 9 September 2026, 10:58
Next Post

E20 पेट्रोलचा गाड्यांवर परिणाम! मायलेज 6% पर्यंत घटू शकते; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp