राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : वरवंड ग्राम शिक्षण संस्थेच्या एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयातील विद्यार्थी आदित्य ज्ञानदेव गडदे याने चेन्नई येथे सुरू असलेल्या भारतातील सर्वोच्च अशा खेलो इंडिया युथ गेम्स २०२४ स्पर्धेमध्ये आर्चरी या क्रीडा प्रकारात सिल्वर मेडल मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
२३ फेब्रुवारी रोजी आदित्य गडदे याचा अंतिम सामना सुरू झाला. अतिशय चुरशीच्या सामन्यात आदित्य गडदे याचे केवळ दोन गुणांनी सुवर्णपदक हुकले. मात्र, आदित्यच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय दिवेकर, संचालक डॉ. विजयराव दिवेकर, ज्येष्ठ संचालक अंकुश दिवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले