अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील करडे येथील अवैध्य मुरुम ऊपसा हा विषय ऐरणीवर आला आहे. तस्कर या मुरुम उपस्याच्या वादातून एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. आज राजरोसपणे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून महसूल विभागाच्या नियमाला पायदळी तुडवून मुरुम ऊपसा व वाहतुक होत आहे. तेथील तलाठी, मंडल आधिकारी, बीट अंमलदार पोलिस हे सर्व अधिकारी नेमक काय करतात? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मोठी आर्थिक तडजोड करुन हा व्यवसाय चालू असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात होत आहे. याच वादाची किनार या प्रकरणाला लागली आहे. बेकायदेशीर जमाव जमवून खंडणी मागून आठ जणांनी एकाला मारहाण करत ट्रकचेही नुकसान केले आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. २९ जुलै रोजी दुपारी १.२० मि. सुमारास मौजे एस. व्ही. एस कंपनी येथील किरण रोडे याच्या निळ्या रंगाच्या बंद असलेल्या टपरीजयळ फिर्यादी निलेश बाळासो महाडीक हे त्यांच्या कारमधुन जात होते. तेव्हा अभिशेक मिसाळ, सकेंत महामुनी व त्यांच्या बरोबर एक अनोळखी मुलगा यांनी पल्सर मोटाररसायकल आडवी मारून निलेश महाडिक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु निलेश महाडिक तेथून कार घेवून पळून गेले.
नतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास समाधान चौक, करडे येथे फिर्यादीनी मुरूम टाकण्या करीता महिन्याला १५ हजार रूपये हप्ता न दिल्याच्या कारणावरून अभिषेक मिसाळ, संकेत महामुनी, बाला शिंदे सर्व रा. शिरूर, शुभम, नवनाथ कलींदर, टिनु शेळके व रोहन पंचमुख सर्व रा. राजणगाव ता. शिरूर पुणे, सुरज पाडळे रा. सोनेसांगवी ता. शिरूर पुणे यानी बेकायदा गर्दी जमाव जमवून निलेश महाडिक यांचा हायवा ट्रक न. एम.एच १२ यु.एम ९८७९ अडवुन चालक जावेद हमीद शेख याला हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. त्यांच्या हातातील लाकडी दाडके व दगडाने मारून हायवा ट्रकचे नुकसान केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे करत आहे.