बापू मुळीक
पुणे : नवीन शैक्षणिक धोरण 2020 चे भारतीय शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट असताना, त्याच्या साधक-बाधकांचे गंभीरपणे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. फायदे आणि तोटे यांचे गंभीरपणे परीक्षण करून, नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, सर्वांगीण विकास, सर्वसमावेशकता आणि सर्वांसाठी समान संधी देणारी शिक्षणप्रणाली सुनिश्चित करण्यासाठी ज्ञान, संस्कार आणि तंत्रज्ञान यातुन विद्या विवेक आणि विचक्षणा याची सांगड घातली तर प्रभावी शिक्षण निर्माण होईल असे प्रतिपादन डॉ. सि. एन. रावळ यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी NEP एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उदघाटन बी. एम. सी. सी. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ.सि. एन. रावळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभाग व IQAC संचालक मा.डॉ. संजय ढोले म्हणाले “नवीन शैक्षणिक धोरण डिजिटल शिक्षण आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर लक्षणीय भर देते. शिक्षणात प्रवेश वाढवून सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल उपकरणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा उपयोग होईल. त्यातून आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना आणखी संधी उपलब्ध होत जाऊ शकतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स विभागाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद पाटील म्हणाले कि, “NEP सहयोगी शिक्षण समुदायांना प्रोत्साहन देते, शिक्षकांना पीअर लर्निंगमध्ये गुंतण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि सहकार्यांसह सहयोग करण्यास प्रोत्साहित करते. यामुळे व्यावसायिक वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते आणि अध्यापनाची प्रभावीता वाढते.”
सर्व मान्यवरांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण पद्धतीत होणारे महत्वाचे बदल व विद्यार्थ्याना असणाऱ्या संधी संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थांना पुरातन भारतीय शिक्षण पद्धत ते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीत झालेला बदलासंदर्भात माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. सुभाष वाव्हळ, प्रा. बाळासाहेब काळे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिकक्षेत्तर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण गाढवे यांनी केले तर आभार कार्यशाळेचे समन्वयक प्रा. दिपक लोखंडे मानले.