अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : दि.३ महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर असून. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. अष्टविनायकापैकी एक असणा-या रांजणगाव गणपती येथील श्री. महागणपती मंदिरात बुधवार दिनांक ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत भाद्रपद गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दि.४ संप्टेंबर ते ८ सप्टेंबर पर्यत मंदिरात भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महागणपतीच्या मुर्तीस स्पर्श करुन दर्शन घेता येणार आहे.
केवळ द्वार यात्रेच्या काळात थेट गाभाऱ्यात जाऊन भाविकांना दर्शन घेता येते . त्यामुळे या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते. बुधवार दि. ४ संप्टेंबर रोजी पूर्वद्वार यात्रे करिता श्रींची पालखी करडे येथील मांजराई (दोनलाई) कडे जाईल. यावेळी पाचुंदकर आळीचा मानकरी आहे. गुरुवार दि. ५ संप्टेंबर रोजी श्रींची पालखी दक्षिणद्वार करिता निमगाव म्हाळुंगी येथील आसराई (शिरसाई) कडे जाईल. यावेळी माळी आळीचा मान असणार आहे .
मुक्तदार दर्शन पहाटे ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत असणार आहे. शुक्रवार दि. ६ संप्टेंबर रोजी पश्चिम द्वार असून श्रीची पालखी गणेगाव येथील ओझराई देवी कडे जाणार असून लांडे आळीचा मानकरी असणार आहे.
यादिवशी मुक्तदार दर्शन पहाटे १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत असणार आहे. यादिवशी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्रीच्या पालखीची मिरवणूक होणार असून ह. भ.प. अवधूत चक्रांकित महाराज आळंदीकर यांचे किर्तन होणार आहे. रविवार दिनांक ८ संप्टेंबर रोजी मुक्तदार दर्शन पहाटे ६ ते सकाळी १० वाजेपर्यत असणार आहे. सकाळी १० ते ११ यावेळेत श्रीच्या पालखीची मिरवणूक असणार असून दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार 9 संप्टेंबर रोजी सकाळी श्रींच्या पुढे भाविकांची दंडवते होतील दुपारी मोरेश्वर बुवा जोशी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. मंगळवार दि १० संप्टेंबर रोजी मानकरांना बिदागीचे वाटप करण्यात येणार आहे.