युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील टाकळी हाजी गावातील सिंगलफेज वीज बंद केल्यांमुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन पाण्याअभावी शेतमाल जळू लागले, उन्हाळ्यात विज बंद करू नका अशी शेतकऱ्यांची महावितरणला आर्त हाक दिली आहे. अशीच अवस्था राहिली तर शेतकरी रस्त्यावर येऊन ‘विज चालू, रस्ता बंद’ असे आंदोलन छेडू असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वा खाली महावितरणच्या कार्यालयावर शंभर शेतकऱ्यांसोबत मोर्चा नेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतकरी म्हणाले की, गावात वीजउपकेंद्र असुन यामधे दोन ट्रान्सफार्मर आहेत गेली दोन दिवसापासुन यावरील लोड वाढल्यांने गावठाण व इतर वाड्या वस्त्यावर सिंगल फेज लाईट अचानक बंद करण्यात आली.
त्यामुळे गावातील छोटे मोठे व्यवसायिक यांच्यावर वीज नसल्याने व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली. हॉटेल मधील पदार्थ फ्रिज बंद असल्याने नाशवंत वस्तू खराब झाले. दुध डेअरी व्यवसायिकांच्या पुढे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे ग्रामस्थानी गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा महावितरण वर मोर्चा काढला होता.
टाकळी हाजीचे उपअभियंता राजेंद्र इंगळे यांना वीज बंद न करता योग्य नियोजन करून दिवसा सिंगल फेज चालु ठेवण्याची विनंती करण्यात आली.
शाखा अभियंता इंगळे यांनी सांगितले की , उपकेंद्रात दहा व पाच एम व्ही ए चे दोन पॉवर ट्रान्सफार्मर आहे. त्यावर जास्त दाब येत आहे.शेतकऱ्यांनी सिंगल फेज वर थ्रि फेज मोटार पंप चालऊ नयेत. तसेच ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
या वेळी घोडगंगाचे संचालक सोपानराव भाकरे,माजी उपसरपंच सखाराम खामकर, प्रकाश भाकरे, बापुसाहेब होने, देविदास पवार, मानवअधिकार संघटना शिरूर तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर,देवीदास पवार, पोपट हिलाळ, भास्कर थोरात, सुभाष घोडे, जर्नादन साबळे, रामदास चोरे, बाळासाहेब भाकरे, पोपट रसाळ,सावकार घोडे, सोपान औटी, भाऊसाहेब घोडे, शंकर थोरात, सावकार ना घोडे, दौलत थोरात, शरद घोडे आदी शेतकरी उपस्थित होते.
ऐन उन्हाळ्यात पाणि टंचाई जाणवत असते. त्यातून शेतमाल कसा संभाळायचा याची चिंता सर्व शेतकरी वर्गात असते. महावितरणने या काळात विजेबाबतची धोरणे व कामासंदर्भात अचूक निर्णय घ्यावेत. त्यातून योग्य निर्णयाने विजेची टंचाई जाणवणार नाही. शेतकरी व महावितरणनचा योग्य संवाद झाल्यास त्यातून शेतकऱ्यांना सहकार्य होईल. मोर्चा आंदोलने करण्याची गरज पडणार नाही. : पोपटराव गावडे माजी आमदार शिरूर
‘विज आहे तर पाणी नाय आता पाणि आहे तर विज नाय’ अशी परिस्थिती तयार झाली आहे. या काळात महावितरणने खरे तर शेतकऱ्यांची बाजू घेऊन नियमित विज पुरवठा केला पाहिजे. या काळातच पिकांना पाण्याचा आधार मिळवून उत्पन्न मिळाले. तरच शेतकरी खऱ्या अर्थाने जगेन. अन्यथा तो रस्त्यावर येईल.
सखारान खामकर माजी उपसरपंच टाकळी हाजी
सध्या कांदा व इतर शेतमालाला बाजार भाव नाही. याला शासनच जबाबदार आहे . शेतमालाचे पैसे झाले असते, तर शेतकर्यांनी विज बिल भरले असते. त्यामुळे शासनाने बिला अभावी ट्रान्सफार्मर बंद करू नयेत. विज वितरण कंपणीला शासनाने निधी द्यावा. : सोपान भाकरे तज्ञ संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना