DREAM11 : पुणे, ता. ११ : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम तयार करून पिंपरी-चिंचवड मधील एका पोलिस उपनिरीक्षकाने तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.
तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले
सोमनाथ झेंडे असे या पोलिस उपनिरक्षकाचे नाव आहे. ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांना क्रिकेटची आवड आहे. झेंडे यांनी गेल्या तीन चार महिन्यांपासून ड्रीम ११ यावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा फिवर सुरू आहे. ड्रीम ११ या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून आपला संघ बनवून अनेक जण आपले नशीब आजमावून पाहत होते.
दरम्यान, सोमनाथ झेंडे यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. आणि यामध्ये त्यांना तब्बल दीड कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. सोमनाथ झेंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऑनलाइन गेम खेळताना रहा सावध
सध्या विश्वचषक सुरु आहे. यामुले ऑनलाईन टीम लावून त्यातून पैसे जिंकण्यासाठी अनेक ऑनलाइन गेम ॲप डाऊनलोड करून त्यावर संघ तयार केले जात आहेत. मात्र, याचा फायदा घेऊन अनेक सायबर चोरटे गंडा घालत आहे. त्यामुळे अनेकांची फसवणूक होत असल्याने असे गेम खेळताना काळजी घ्यावी.
सोमनाथ झेंडे (पोलिस उपनिरक्षक)