अक्षय टेमगिरे
रांजणगाव एमआयडीसी : रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसरात आठवडे बाजारामध्ये व प्रवासामध्ये मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या होत्या. सदरचे गहाळ झालेल्या मोबाईल पैकी तब्बल 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 13 मोबाईल हे ट्रेसिंग करून परत मिळविण्यात राजंणगाव MIDC पोलीस स्टेशन कडील तपास पथकास यश मिळाले आहे.
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला गहाळ झालेले मोबाईल तपास पथकाचे सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे व पो.कॉ. उमेश कुतवळ यांनी ट्रैसिंगला लावुन गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम सुरु केले होते. बहुतांश नागरीक हे एकदा गहाळ झालेला मोबाईल परत मिळण्याची अशा सोडुन देत असतात. परंतु सन 2024 मध्ये आत्तापर्यंत गहाळ झालेल्या मोबाईल पैकी तब्बल 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 13 मोबाईल हे ट्रेसिंग करून परत मिळविण्यात राजंणगाव MIDC पोलीस स्टेशन तपास पथकास यश मिळाले आहे.
सदरचे मोबाईल शोधुन काढण्यात आलेले हे दि. 28 ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या हस्ते मुळ मोबाईल मालकांना परत करण्यात आले आहेत. रांजणगाव MIDC पोलीसांनी ऐन दिवाळीच्या मुहर्तावर गहाळ झालेल्या 13 मोबाईलचा शोध घेवुन ते परत केल्याने नागरीकांना पोलीस स्टेशनकडून दिवाळी गिफ्ट मिळाल्याची भावना संबंधीत नागरीकांनी बोलुन दाखविली आहे. तसेच पोलीसांप्रती आदर व्यक्त करत केला आहे. सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर यांनी केली आहे.