युनुस तांबोळी
शिरूर, (पुणे) : तुज मागतो आता…,शिर्डी वाले साई बाबा…,समा है सुहाना नशे मे जहा है.., दिल तो हे दिल… दिल का इतबार क्या किजीए…, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग…,और एस दिल मे क्या रखा है तेरा हि दर्द छुपा रखा है…, होटो से छू लो तूम मेरा गित अमर कर दो…अशा वेगवेगळ्या बहारदार गितांनी शिरूर पोलिस स्टेशनला दिपावली स्वरसंध्याचा कार्यक्रमात दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छांनी रंग भरला होता.
आम्ही शिरूरकर आणि शिरूर पोलिस स्टेशनच्या सयुंक्त विद्यमाने दिपावली स्वरसंध्येचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. पत्रकार मित्र व पोलिस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर आदी पत्रकार, पोलिस उपस्थित होते.
पत्रकार प्रविण गायकवाड, निलीमा सोनवणे, अश्विनी रानडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलिस कॅान्सटेबल सरेश रणसोर, मानवी गायकवाड, शिक्षक प्रवीण गायकवाड यांनी गिते सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू सानप यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॅा. इश्वर पवार यांनी केले. पत्रकार संतोष शिंदे यांनी आभार मानले.
बातमीसाठी पत्रकार आणी बंदोबस्तासाठी पोलिस हे दिवसरात्र समाजासाठी झटत असतात. दिवाळीत आपल्या कुटूंबासमवेत काही काळ आनंदात रहावे यासाठी हा स्वरसंध्येचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. पत्रकार व पोलिसांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटावा. ताणतणाव दुर करावा. यासाठी दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा
-संजय जगताप, पोलिस निरीक्षक, शिरूर