युनस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने २०२३ ची दिनदर्शीका तयार करण्यात आली असून शिरूर तालुक्याच्या बेट भागात शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या वतीने वितरण करण्यात आल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य युनूस तांबोळी यांनी दिली.
६ जानेवारी पत्रकार दिनाचे आौचित्य साधून रावडेवाडी (ता. शिरूर ) येथील पराग ॲग्रो फुडस ॲण्ड अलाइड प्रा. लि येथे शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाची दिनदर्शीकेचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. व्ही. जंगले, सरव्यवस्थापक डि. यु. वाबळे, एस. एम. जाधव, मुख्य अभियंता ए. डी. चोरघे, मुख्य शेतकी अधिकारी ए. बी. आढाव, मुख्य लेखापाल एन. एस. भगत, किशोर नेवसे आदी उपस्थित होते.
पराग ॲग्रो फुडस ॲण्ड अलाइड प्रा. लि चे चेअरमन हर्षवर्धन डहाके यांच्या वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवाना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.