शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील रामलिंग या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणात गाईच्या प्रेमापोटी चक्क गायीचे डोहाळे जेवण घालण्यात आले आहे. रामलिंग येथील हिराबाई रामदास जामदार यांनी गायीचे डोहाळे जेवण करून गायीचे महत्त्व सांगितले. गावातील सर्व ठिकाणी या डोहाळे जेवनाची चर्चा सुरू आहे. मुक्या प्राण्यांना जीव कसा लावावा त्यांचे पालन पोषण कसे करावे, हे यातून पहायला मिळाले. या गाईला सर्व कपिला म्हणून हाक मारतात. यावेळी पूर्ण सजावट केली होती. सर्व प्रकारचे फळ, घास,पेढे, सर्व पदार्थ आणले होते. सर्वांनी गाईची पूजा करून, तिला वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. तिच्यासाठी महिलांनी डोहाळे गाणे सुद्धा गायले.
गाय आणि माय सारखीच आहे, म्हणून तिला देव मानले आहे. असेच सर्वांनी मुक्या प्राण्यांना जीव लावला पाहिजे. गाय हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. गाय या प्राण्याची हिंदू धर्मामध्ये पूजाअर्चा केली जाते. तसेच गाईला हिंदू धर्मामध्ये उच्च स्थान आहे. गाईच्या पाडसाला वासूरू असे म्हणतात. गाईचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे. श्रीकृष्ण यांना गाय अतिशय प्रिय होती. त्यामुळे गायीची पूजा हे अनंत कालापासून चालत आलेली आहे.
भारतीय गाईच्या संकरित जाती आहेत तसेच विदेशी गाई सुद्धा आहेत. भारतामध्ये गाईपासून दूध मिळवले जाते. त्या व्यतिरिक्त गाईपासून शेणखत मिळते. जे आपण शेतामध्ये खत म्हणून उपयोगी आणू शकतो. या खतामुळे शेतातील जमिनीतील पोषक मूलद्रव्य निर्माण होऊन पीक उत्पादनात वाढ होते.
गाईचे गोमूत्र देखील हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. गोमित्र मुळे शरीरशुद्धी केली जाते. गायीचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषधी आहे. अशी सुद्धा काही हिंदू लोकांची समज आहे. गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे पोषण करते. हिंदू धर्मामध्ये मात्र गोहत्या पाप आहे. गाईचे दूध दही ताक अत्यंत मौल्यवान आहे. जे मानवी शरीरासाठी उपयुक्त घटक आहेत. त्यामधून मानवी शरीराला पोषक घटक मिळतात. विदेशी किंवा संकरित गाईपेक्षा देशी गाय ही खूप महत्त्वाची असते.
हिंदू धर्मात गाईचे मास खात नाही. तर चला मग गाय सर्वांनी एक तरी पाळली पाहिजे. तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गाय हा प्राणी भारतामध्ये सर्वत्र पाहायला मिळतो. शहर असो किंवा ग्रामीण भाग, गाय हा प्राणी असतो. ग्रामीण भागामध्ये गाईला खूप महत्त्व दिले जाते. गाय जिथे राहते तिला गोठा असं म्हटलं जातं. गाईंना गोठ्यात बांधले जाते. त्यांना खाण्यासाठी नैवेद्य देखील दिला जातो, तिची पूजा केली जाते. गायीचे डोहाळे जेवणावेळी सुनंदा घावटे, रोहिणी जामदार, कोमल जामदार, सविता जामदार, स्नेहा जामदार, वर्षा जामदार, मीरा घोडके, संगीता मोहळकर अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.