पुणे : मागील चार- पाच दिवसात मोठा पाऊस झालेला नाही तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या ओढ्याचे पाणी कमी झाल्याने धरणातील विसर्ग मंगळवारी (ता. १९) सकाळी सहा वाजल्यापासून पूर्णपणे बंद केला आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.
खडकवासला धरण सध्या १०० टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळीतील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सोमवारी सकाळी सहा वाजता पूर्ण बंद केला आहे. परंतु या धरणात मागील चार- पाच दिवसात मोठा पाऊस झालेला नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. परिणामी ओढ्याचे पाणी कमी झाल्याने धरणातील येवा बंद झाल्याने धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे.
धरणातील विसर्ग एक हजार ७१२ क्यूसेक होता. तो आज पहाटे पाच वाजता ८५६ क्यूसेक केला. सहा वाजता पूर्ण बंद केला. धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. आज सकाळी सहा वाजता बंद केला. खडकवासला धरण साखळीत मिळून एकूण पाणीसाठा १८.८९ टीएमसी झाला आहे.