आळंदी : आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज इंद्रायणीचा काठ वाऱ्यकऱ्यांनी फुलला आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या गरजात वारकरी तल्लीनं झाल्याचं चित्र आज आळंदीत बघायला मिळत आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. यानिमित्त आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वारकरी विठू रायाच्या भेटीसाठी उत्सुक झालेले बघायला मिळत आहेत.
इंद्रायणीचा काठ वाऱ्यकऱ्यांच्या भक्ती रसाने दुमदुमला आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या गरजात वारकरी तल्लीनं झाल्याचं चित्र आज आळंदीत पाहायला मिळत आहे. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पालखीचे प्रस्थान झाले आहे.
इंद्रायणीच्या घाटावर वाऱ्यकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहच वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. या सोहळ्याचे निमित्ताने तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून सोयीसुविधांची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत.