पुरंदर : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील नारायण महाराज यांचे सोमवारी, 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. नारायणपूर येथील दत्त मंदिरात नारायण महाराज यांचं वास्तव्य होतं.
8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शन, तर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार..
भाविकांचे श्रद्धास्थान परमपुज्य निश्खचैतन्य श्री सदगुरु नारायण महाराज हे ‘अण्णा’ या नावाने ओळखले जात असत. नारायण महाराजांचं पार्थिव सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी नारायणपूर येथील मंदिरात ठेवण्यात येणार असून दुपारी 4 वाजता नारायणपूर येथील यज्ञकुंडाजवळ पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नारायण महाराज यांच्या जाण्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
चार दत्तधामांची उभारणी..
नारायण महाराज हे विविध समाजकार्यात नेहमी पुढे असत. गावोगावी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ, सामुदायिक शेती आणि श्रमदान असे उपक्रम राबवले. नारायण महाराजांनी भारतातील चार दिशांना चार दत्तधाम बांधले, त्यापैकीच एक नारायणपूर येथे आहे.