Daund News : संदीप टूले : पुणे जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांपैकी 11 साखर कारखान्यांनी साखर हंगाम संपून 3 महिने झाले तरी अद्यापही एफआरपी पूर्ण केली नाही. अशा साखर कारखान्यांनी त्वरित व्याजासहित एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, यासाठी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे व दौंड तालुका रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सरफराज शेख यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना लेखी निवेदन दिले आहे.( Daund News)
एफआरपी एका टप्प्यात 15 दिवसाच्या आत देण्याचा कायदा आहे.
एफआरपी एका टप्प्यात 15 दिवसाच्या आत देण्याचा कायदा आहे. परंतु, साखर कारखानदार शेतकऱ्यांना भूलथापा देऊन दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी संमती पत्र लिहून घेतात.( Daund News) याचाच गैरफायदा साखर कारखानदार घेतात. परंतु, दोन टप्प्यातील एफआरपीचे संमतीपत्र हे बेकायदेशीर असून, संमतीपत्र जरी शेतकऱ्यांनी दिले तरीसुद्धा एफआरपी एका टप्प्यात देणे आवश्यक असते.
जर 30 जून 2023 पर्यंत शेतकऱ्यांना थकीत एफआरपी व्याजासहित न मिळाल्यास 1 जुलै 2023 पासून रयत क्रांती पक्ष, संघटना संबंधित साखर कारखान्यावर आंदोलन करणार आहे. अशाप्रकारचे लेखी निवेदन साखर आयुक्त यांना देण्यात आले आहे.( Daund News)