Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंडमध्ये 3 ठिकाणी छापेमारी; साडेतीन हजार लिटर स्पिरीटसह 12 हजार बाटल्या जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 29 January 2026, 22:55
Daund News: Raids at 3 places in Daund; 12 thousand bottles including three and a half thousand liters of spirit seized, action by the Excise Department

दौंड: दौंड तालुक्यात बनावट दारूच्या (Daund News) धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठा घाव घालत अवैध मद्यनिर्मितीचे संपूर्ण जाळे उघडकीस आणले आहे. 27 जानेवारी 2026 रोजी एकाच दिवशी तीन ठिकाणी करण्यात आलेल्या धडक कारवाईत बनावट दारू बनवणारी ‘फिरती फॅक्टरी’, साठवणूक केंद्रे आणि वाहतूक यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईत तब्बल 12,642 बनावट दारूच्या बाटल्या, 3,500 लिटर स्पिरीट, चार वाहने आणि दारू बनवण्याची यंत्रसामग्री असा एकूण 85 लाख 42 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime)

दौंड–अहिल्यानगर रोडवर मुंबईतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एका आयशर टेम्पोची तपासणी केली असता, त्या टेम्पोमध्येच दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले. चालत्या टेम्पोत स्पिरीट, स्वयंचलित बॉटलिंग मशीन आणि तयार बनावट दारू सापडली. या प्रकरणात धुळ्याचा रहिवासी सुनील प्रताप नगराळे याला अटक करण्यात आली. या कारवाईतच सर्वाधिक, म्हणजे जवळपास 59 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याच दिवशी दौंड विभागाच्या पथकाने पुणे–सोलापूर रोडवरील पांढरेवाडी परिसरात छापा टाकून ट्रॅक्टर आणि ह्युंदाई कारमधून होणारी बनावट दारूची वाहतूक उधळून लावली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशी बनावट दारू सापडली. विजय जालिंदर झगडे याला अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार सोमनाथ नांदखिले फरार झाला होता. पुढील तपासात गार गाव परिसरातील एका शेताजवळील वीटभट्टीजवळ लपवून ठेवलेला आणखी दारूचा साठा सापडला आणि तेथून सोमनाथ नांदखिले यालाही अटक करण्यात आली.

 

या तिन्ही कारवायांत एकूण 3,500 लिटर स्पिरीट, बनावट दारूच्या हजारो बाटल्या आणि वाहने जप्त करण्यात आली असून विजय झगडे, सुनील नगराळे आणि सोमनाथ नांदखिले या तिघांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने तिघांनाही कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील बनावट दारूच्या व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून ; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी यांची नियुक्ती

Sunday, 21 June 2026, 12:48

कुरकुंभच्या ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; 48 तासांत वीज-पाणी तोडण्याचे आदेश

Sunday, 21 June 2026, 12:38

येरवडा मनोरुग्णालयात फक्त एका ‘चादरीवरून’ वाद झाला अन् घडलं भयंकर…

Sunday, 21 June 2026, 12:32

पुण्यात ‘मी इथला भाई’, म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Sunday, 21 June 2026, 11:49

भुलेश्वर घाटात ‘देवदर्शना’च्या बहाण्याने नेऊन तरुणाला बेदम मारहाण; तरुणीसह 3 अनोळखी इसमांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 11:13
Next Post

Daily Horoscope: शुक्रवारचे राशीभविष्य! कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ? पाहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.