Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्ली-पुणे विमानात ३० हजार फूट उंचावर भयानक थरार! प्रवाशाने खिडकी समजून चक्क दार उघडण्याचा केला प्रयत्न; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 November 2026, 20:45

पुणे : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानात हवेत असताना आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानातील आपत्कालीन दरवाजाच्या लिव्हरवरील कव्हर उघडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केल्याने सेन्सर वाजू लागले. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गौरव सत्येंद्र रौतेला (वय ३३, रा. आनंद पार्क, तारादत्त पूर्व सोसायटी, सासवड) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. इंडिगो कंपनीच्या सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक ओंकार विनोद कुलकर्णी (वय २८, रा. हिंजवडी) यांनी याबाबत विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास दिल्ली-पुणे विमानात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव रौतेला हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. ते इंडिगोच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला प्रवास करत होते. विमानाने दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच अचानक सेन्सरचा आवाज येऊ लागला. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

विमानातील वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, १९ बी सीटवर बसलेला प्रवासी आपत्कालीन दरवाजा उघडण्यासाठी असलेल्या लिव्हरवरील कव्हर उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. विमानातील इतर कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी तत्काळ त्याला रोखले.

चौकशीदरम्यान संबंधित प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा म्हणजे खिडकी असावी, असे समजून तो उघडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र, हवेत असताना विमानाच्या आपत्कालीन दरवाजाशी छेडछाड केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात भयानक अपघात! पीएमपीएल बस थेट थांब्यावर आदळली; ८ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Tuesday, 3 November 2026, 22:59

लोणी काळभोर येथील सराईत मटका जुगार चालक विनोद झेंडे दोन वर्षांसाठी हद्दपार!

Tuesday, 3 November 2026, 22:15

पुण्यात अचानक हवामान बदलले! ‘मुरासू’ चक्रीवादळामुले तापमानात बदल; वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची तीव्र शक्यता

Tuesday, 3 November 2026, 22:13

पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी तुफान गर्दी! ४,४६२ घरांसाठी तब्बल ३.२५ लाखांहून अधिक अर्ज दाखल

Tuesday, 3 November 2026, 21:21

दिल्ली-पुणे विमानात ३० हजार फूट उंचावर भयानक थरार! प्रवाशाने खिडकी समजून चक्क दार उघडण्याचा केला प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Tuesday, 3 November 2026, 20:45

Loni Kalbhor News: शाळेच्या बॅगेत कोयते घेऊन आले विद्यार्थी; पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या!

Tuesday, 3 November 2026, 19:50
Next Post

पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी तुफान गर्दी! ४,४६२ घरांसाठी तब्बल ३.२५ लाखांहून अधिक अर्ज दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp