Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: शाळेच्या बॅगेत कोयते घेऊन आले विद्यार्थी; पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 November 2026, 19:50

लोणी काळभोर, ता. 3 : मुलांना शाळेत पाठवले म्हणजे पालकांची जबाबदारी संपली, असे समजत असाल तर सावध व्हा! लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका नामांकित शैक्षणिक संकुलात शिकणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बॅगेत तब्बल तीन कोयते आढळल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हे कोयते आणल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

लोणी गावातील अंबरनाथ मंदिराच्या परिसरातील आणि कदमवाकवस्ती येथील पांडवदंड परिसरातील चार विद्यार्थ्यांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. या वादातून एकमेकांना धडा शिकविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी शाळेच्या बॅगेत कोयते घेऊन आल्याचे समोर आले. मात्र, वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने संभाव्य अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत चारही अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे, अजून शिक्षण घेण्याच्या आणि आयुष्य घडविण्याच्या वयात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी कोयते येणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. किरकोळ वादातून एकमेकांवर शस्त्राने हल्ला करण्यापर्यंत विद्यार्थ्यांची मजल जात असेल, तर त्यांच्या संगोपनासह सामाजिक वातावरणाचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ नये, या दृष्टिकोनातून त्यांना समज दिली. तसेच त्यांच्या पालकांना बोलावून मुलांच्या वर्तनाकडे लक्ष देण्याबाबत चांगलीच तंबी दिली. त्यानंतर चारही विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

पालकांनो, जबाबदारी झटकू नका!
मुलांच्या हातात महागडा मोबाईल देणे, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करणे आणि त्यांना शाळेत पाठवणे एवढेच पालकांचे कर्तव्य नाही. मुले कोणाच्या संगतीत राहतात, मोबाईलवर काय पाहतात, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या वागण्यात काही बदल झाला आहे का, याकडेही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा चुकीची संगत आणि वाढती हिंसक प्रवृत्ती मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करू शकते. आज शाळेच्या बॅगेत कोयता सापडला आहे; उद्या अशाच निष्काळजीपणातून एखाद्याच्या जीवावर बेतणारी घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी सासू-सासऱ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Wednesday, 4 November 2026, 22:57

सकाळी पुण्यातून डिस्चार्ज अन् दुपारी मुंबईत… शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल!

Wednesday, 4 November 2026, 22:25

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हाय-व्होल्टेज ड्रामा! वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीवर पार्थ पवारांनी दिला शब्द; नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 4 November 2026, 21:59

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; उद्या ३४ हजार ५०० कर्मचारी सामूहिक रजेवर

Wednesday, 4 November 2026, 21:09

२ ते ३ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! अटल सेतूपेक्षाही मोठा सागरी पूल; मुंबईत ५८,७५४ कोटींचा नवीन सी-लिंक

Wednesday, 4 November 2026, 20:23

पुणेकरांना दिवाळीचा दिलासा! उद्याची नियोजित पाणीकपात रद्द; ५ नोव्हेंबर रोजी शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा

Wednesday, 4 November 2026, 19:44
Next Post

दिल्ली-पुणे विमानात ३० हजार फूट उंचावर भयानक थरार! प्रवाशाने खिडकी समजून चक्क दार उघडण्याचा केला प्रयत्न; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp