Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील सराईत मटका जुगार चालक विनोद झेंडे दोन वर्षांसाठी हद्दपार!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 November 2026, 22:15

लोणी काळभोर, ता. 3 : पोलिसांच्या वारंवार प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही बेकायदेशीर मटका जुगाराचा व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या लोणी काळभोर येथील सराईत आरोपी विनोद साहेबराव झेंडे (वय 44, रा. इंदिरानगर, लोणी स्टेशन, ता. हवेली) याला पुणे शहर पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगार आणि अवैध धंदेचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील मटका-जुगार, गावठी हातभट्टीची दारू विक्री, अंमली पदार्थांची तस्करी तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर लोणी काळभोर
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनोद झेंडे हा पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत मटका जुगार चालक असल्याचे समोर आले होते. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईला न जुमानता त्याने पुन्हा बेकायदेशीर मटका जुगाराचा व्यवसाय सुरूच ठेवल्याचा आरोप आहे. या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून, अनेक कुटुंबांच्या संसारावर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या आरोपीच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त, परिमंडळ-६ यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाची दखल घेत पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी विनोद झेंडे याला दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.

अवैध धंदेचालकांविरोधात कारवाई सुरूच राहणार!
ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, पोलीस हवालदार विलास शिंदे, महिला पोलीस हवालदार स्वाती पिसाळ, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांनी केली.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर धंदे करणाऱ्या आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी सासू-सासऱ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Wednesday, 4 November 2026, 22:57

सकाळी पुण्यातून डिस्चार्ज अन् दुपारी मुंबईत… शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल!

Wednesday, 4 November 2026, 22:25

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हाय-व्होल्टेज ड्रामा! वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीवर पार्थ पवारांनी दिला शब्द; नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 4 November 2026, 21:59

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; उद्या ३४ हजार ५०० कर्मचारी सामूहिक रजेवर

Wednesday, 4 November 2026, 21:09

२ ते ३ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! अटल सेतूपेक्षाही मोठा सागरी पूल; मुंबईत ५८,७५४ कोटींचा नवीन सी-लिंक

Wednesday, 4 November 2026, 20:23

पुणेकरांना दिवाळीचा दिलासा! उद्याची नियोजित पाणीकपात रद्द; ५ नोव्हेंबर रोजी शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा

Wednesday, 4 November 2026, 19:44
Next Post

पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात भयानक अपघात! पीएमपीएल बस थेट थांब्यावर आदळली; ८ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp