Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : खडकी येथील आनंद हॉटेल लॉजिंग अ‍ॅन्ड बारवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका, ग्रामीण पोलिसांची संयुक्त कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 4 January 2026, 18:48
Daund News: Prostitution busted at Anand Hotel Lodging and Bar in Khadki; Six women rescued, joint effort by rural police

दौंड: दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी (ता. दौंड) येथील (Daund News) आनंद हॉटेल, लॉजिंग अ‍ॅन्ड बारमध्ये दौंड पोलिसांनी छापा टाकून वेश्या (Daund) व्यवसाय सुरु असल्याचे उघड केले आहे. या कारवाईत (Pune Crime) एकूण सहा महिलांची पोलिसांनी सुटका केली. तर एका आरोपीस अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. या कारवाईत लॉजमधील आठ खोल्यात तपासादरम्यान पाच कंडोम पाकिटे, ग्राहक नोंदवही व आरोपीकडून एक हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. (Latest Marathi News)

विश्वनाथ राजू शेट्टी (वय 41, सध्या रा. आनंद लॉज, खडकी, ता. दौंड जि.पुणे, मुळ रा.तल्लोर ता. कंदापुर जि. उडपी राज्य कर्नाटक) असे अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार मनोज मोहीते (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हा फरार झाला आहे. या प्रकरणी दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संजय कोठावळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दौंड पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पुणे ग्रामीण यांनी बुधवारी (ता. 03) लॉज तपासणी मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी साडेसात वाजता दोन पंचासमक्ष संयुक्त पथकाने खडकी येथील आनंद लॉजवर छापा टाकला. यावेळी हॉटेलचे काउंटर समोर खुर्चीवर दोन इसम बसलेले दिसले. पोलिसांची चाहूल लागताच तेथुन पळु लागले त्यावेळी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एकजण पळून गेला.

 

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे व पळून गेलेल्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. लॉजींग मध्ये जावुन पाहणी केली असता आठ खोल्या दिसून आल्या. तेथील रूमची पाहणी केली असता त्यामध्ये एकुन 6 मुली व कंडोमचे पाकीट मिळुन आले. सदर मुलींची चौकशी केली असता सदरच्या मुली या पश्चिम बंगाल येथील 3, मुब्रा, धारावी, कर्नाटक, येथील प्रत्येकी एक असल्याचे सांगितले.

विश्वनाथ शेट्टी याचीव पंचा समक्ष तपासणी केली असता रोख एक हजार रुपये मिळून आले. त्यास हॉटेलचे मालकाबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचे हाँटेल हे झुंबर जयवंत काळभोर रा. गुन्हवरेवस्ती, खडकी ता. दौंड यांचे असुन ते त्यांनी त्यांचेकडुन चालविण्यासाठी घेतले आहे. असे सांगितले. त्यावेळी काउंटर ची पाहणी केली असता तेथे येणाऱ्या ग्राहकांच्या नोंदीचे रजिस्टर मिळुन आले. पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

दरम्यान, पोलिस चौकशीत ताब्यात घेतलेल्या महिलांनी आपण लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याची कबुली दिली. प्रत्येक ग्राहकाकडून एक हजार रुपये घेतले जात असून त्यातील पाचशे रुपये महिलांना दिले जातात, तर उर्वरित रक्कम आरोपी विश्वनाथ शेट्टी व मनोज मोहीते ठेवून घेत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 04/2026 अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दौंडमध्ये वेश्या व्यवसाय सुरू पोलिस मात्र अनभिज्ञ?
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरकुंभ – दौंड रस्ता, कुरकुंभ – बारामती रस्ता, चौफुला – पाटस – कुरकुंभ रस्ता, पाटस – वायरलेस फाटा – दौंड या रस्त्यांवरील काही हॅाटेल आणि दौंड शहरात देखील वेश्या व्यवसाय सुरू आहे पण दौंड पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे वेश्या व्यवसाय सर्रास सुरू असुनही छापे पडत नाहीत. पोलिसांना या व्यवसायाची खबर कशी मिळत नाही, हे आश्चर्यच असल्याचे नागरिकांची कुजबुज सुरु आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Weather Update: दिलासादायक बातमी! राज्याच्या विविध भागांत लवकरच पावसाची शक्यता

Friday, 12 June 2026, 12:52

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्याचा? जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

Friday, 12 June 2026, 12:47

कोलवडी येथे ‘काही पैसे रोख आणि उरलेले ऑनलाईन देतो’ म्हणणे पडले महागात; हॉटेल चालकाची ग्राहकाला काठीने बेदम मारहाण

Friday, 12 June 2026, 12:39

विश्वराज हॉस्पिटलसमोरून पोलिसाची कार पळवली; कारने ॲक्टिव्हाला दिली धडक, मद्यधुंद चालक ताब्यात

Friday, 12 June 2026, 12:30

कदमवाकवस्तीत भरधाव दुचाकीची धडक; महिला गंभीर जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 12:22

Loni Kalbhor News: अंगूर बारसमोरून ‘युनिकॉर्न’ मोटारसायकल लंपास; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 12:19
Next Post
Pune Mahapalika Election: Pune's battle! "Will the son take revenge for the father?" 'Bhau' versus 'Bhau'; Dhangekar versus Bidkar fight, the reputation of the veterans is at stake

Pune Mahapalika Election: पुण्याचा रणसंग्राम! "बापाचा बदला मुलगा घेणार?"'भाऊ' विरुद्ध 'भाऊ'; धंगेकर विरुद्ध बिडकर लढत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.