Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरबरा, कलिंगड उत्पादक चिंतेत…

संदीप टूलेby संदीप टूले
Tuesday, 1 April 2025, 21:18

दौंड: दौंड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी अवकाळी पाऊस पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दौंड तालुक्यात कांदा व गव्हाचे उत्पादक जास्त प्रमाणात आहेत. तसेच कलिंगड व टरबूज उत्पादक प्रत्येक गावामध्ये जेमतेम आहेत. मात्र, या उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवकाळी पाऊस झाला, तर मोठा फटका या शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कांदा भिजून नुकसान होण्याची शक्यता

तालुक्यातील सर्वच भागात कांदा पीक काढण्याची लगबग सुरू आहे. त्यात काढलेल्या कांद्यासाठी चाळी तयार करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम अनेक शेतकरी करत आहेत. कारण कांद्याचे दर पडल्या असल्याकारणाने कांदा साठवणुकीकडे शेतकरी वळले आहेत. त्यात पावसाच्या वातावरणामुळे साठवणुकीचा खर्चही अचानक वाढला आहे. शेतकऱ्यांपुढे  दराचे संकट असताना आता अवकाळी पाऊस झाला तर कांदा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.

मळणीयंत्राची मागणी वाढली

रब्बी हंगामातील गहू आणि हरभर्‍याची काढणी अंतिम टप्प्यात आहे.  दरम्यान, अचानक वातावरणात बदल झाल्याने गहू व हरभरा काढणीकडे शेतकऱ्यांचा कल अचानक वाढल्याने मळणीयंत्राची मागणी वाढली आहे. काही शेतकऱ्यांना मळणी यंत्र मिळते तर काही तशेच प्रतीक्षेत आहेत.

कलिंगड, काकडी, टरबूज उत्पादकांना अवकाळी पाऊसची चिंता

तालुक्यातील काही भागांतील शेतकर्‍यांनी कलिंगड, काकडी, टरबूज आदी उन्हाळी पिके घेतली आहेत. यातून शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पन्न मिळत होते. मात्र, अचानक ऊन कमी झाल्याने मागणी घटली व याचा बाजारभावावर परिणाम झाला असून पाऊस झालाच तर शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
आता हंगाम ऐन भरात असताना अवकाळीची चिंता उत्पादक शेतकर्‍यांना सतावू लागली आहे.

 

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

यंदा दौंड तालुक्याला अगदी मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परंतू, दौंड तालुक्यात पिण्यासह शेतीला मुबलक पाणी असले तरीही वातावरणात होणार्‍या वारंवार बदलामुळे शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. एकीकडे उन्हापासून संरक्षण करत पीक जगवायचे आणि पाऊस पडला तर नुकसान सहन करायचे, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.

मागील आठवड्यात कांदा काढणीला सुरुवात केली असून ऊन मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने मजूर मिळाले नाहीत, त्यात दर ही पडलेले आहेत. म्हणून साठवणूक करणे हाच पर्याय होता. साठवणूक केली आता हे ढगाळ वातावरण झाले आणि साठवणुकीचा (ताढपत्री) मनुष्यबळ यांचा खर्च वाढला. ते करूनही कांदा भिजण्याची भीती अजून कायम आहे.

– गुलाब शेळके, कांदा उत्पादक शेतकरी 

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथे महालक्ष्मी देवीच्या गळ्यातील 10 लाखांचं सोन्याचं गंठण गायब; परिचित महिलेवर चोरीचा संशय

Saturday, 24 October 2026, 10:42

Loni Kalbhor News : पुणे-सोलापूर महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; चार वाहनचालकांवर गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 10:37

एमआयटी कॉलेजमध्ये गेली अन् अचानक गायब! लोणी काळभोर येथील 20 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Saturday, 24 October 2026, 10:28

इथेनॉल बनवण्यावर निर्बंध अन् साखर कारखान्यांसमोर संकट! ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत

Saturday, 24 October 2026, 9:56

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01
Next Post
dhan producer farmer get subsidy in murbad taluka thane

मुरबाड तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp