Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: पतीला पोलिसाची नोकरी लागताच मागितला २० लाखांचा हुंडा! पत्नीला नांदविण्यास नकार; पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 November 2026, 12:38

यवत, ता. 21 : पतीला पोलिसाची सरकारी नोकरी लागल्यानंतर पत्नीने माहेरून 20 लाख रुपये हुंडा आणावा, यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पत्नीला नांदविण्यास नकार देत तिच्या वडिलांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हातवळण (ता. दौंड) येथील 22 वर्षीय विवाहितेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेचे पती पती अमोल चौगुले, सासरे संभाजी चौगुले, सासू सुनीता चौगुले, दीर अनिकेत चौगुले, संदीप थोरात, नणंद ज्योती साबळे आणि रोशन साबळे (सर्व रा. गाडीलगाव पोस्ट गुणोरे ता. पारनेर जि. अहिल्यानगर) अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अमोल चौगुले याच्याशी 4 एप्रिल २०२४ रोजी विवाह झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबाने सुमारे 25 लाख रुपये खर्च केला होता. त्यासाठी वडिलांनी पाच लाख रुपयांचे कर्जही घेतले होते. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून किरकोळ कारणांवरून टोमणे मारणे व मानसिक त्रास देणे सुरू झाले.

दरम्यान, 10 ऑक्टोबर 2024 रोजी पती अमोल याला पोलिसाची नोकरी लागल्यानंतर सासू-सासरे व इतर नातेवाइकांनी माहेरून 20लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास पतीला दुसरे लग्न लावून देण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पतीचे अन्य महिलांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करून जाब विचारला असता पतीने मारहाण केल्याचा आरोपही पत्नीने केला आहे.

पतीने पत्नीला नांदविण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी 21 मार्च 2026 रोजी दिली. पत्नीला घेण्यासाठी आलेल्या तिच्या वडिलांना दीर अनिकेत चौगुले आणि त्याचा मित्र संदीप थोरात यांनी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. महिला समुपदेशन केंद्रात तक्रार करूनही सासरच्या मंडळींनी नांदविण्यास नकार दिल्यानंतर अखेर आरती यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलिस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण! आरती मारणे यांच्यासह चार महिलांवर गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 14:45

पुण्यात अतिक्रमणधारकांना महापालिकेचा दणका! सिंहगड रस्त्यावरील प्रसिद्ध खाऊ गल्लीवर थेट हातोडा

Saturday, 21 November 2026, 14:23

YCM Hospital :वायसीएम रुग्णालयातील औषधांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह !FDA ची धडक कारवाई; तब्बल 1 कोटी 90 लाखांचा औषधसाठा जप्त..

Saturday, 21 November 2026, 14:06

ना कार्यालय, ना सभागृह! हवेली पंचायत समितीची मासिक सभा थेट सिंहगडावर; जिल्हा परिषदेकडूनही मिळाली मंजुरी

Saturday, 21 November 2026, 14:03

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यातील शेतकऱ्यांना संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Saturday, 21 November 2026, 13:22

हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! दोन नवीन स्थानके सुरू होणार, कधीपासून करता येणार प्रवास? वाचा

Saturday, 21 November 2026, 13:10
Next Post

दौंडमध्ये पोलिसांचे तीन मटका जुगार अड्ड्यांवर छापे, १२ जणांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp