Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! दोन नवीन स्थानके सुरू होणार, कधीपासून करता येणार प्रवास? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 21 November 2026, 13:10

पुणे: पुणेकरांसह हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील बाणेर गाव आणि बाणेर-पाषाण लिंक रोड ही दोन स्थानके सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले असून, डिसेंबर 2026 मध्ये प्रवाशांसाठी ती खुली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रवासासाठी आणखी एक सोयीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

मात्र, मेट्रो सेवा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी आणि आवश्यक परवानग्या मिळणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (CMRS) पथक याच आठवड्यात संबंधित मार्गाची पाहणी करणार आहे. या तपासणीत स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक सुविधा आणि इतर आवश्यक बाबींची पडताळणी केली जाणार आहे.

तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास त्या दूर केल्यानंतरच प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळेल. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आवश्यक सुधारणा करण्यासाठी साधारण 10 ते 12 दिवस लागू शकतात. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास डिसेंबरमध्ये दोन्ही स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू होऊ शकते.

ही स्थानके सुरू झाल्यानंतर पिंक लाइनवरील कार्यरत स्थानकांची संख्या 17 वरून 19 होणार आहे. त्यामुळे बाणेर, पाषाण आणि हिंजवडी परिसरातील प्रवाशांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मेट्रो मार्गावरील आणखी चार स्थानके जानेवारी 2027 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. यामध्ये पीएमआर-13, पीएमआर-14, पीएमआर-20 आणि पीएमआर-22 या स्थानकांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या वाहनांसाठी मेट्रो स्थानकांजवळ पार्किंगची सुविधाही विकसित केली जात आहे. यासाठी 20 जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यापैकी 5 ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जागांवरील प्रक्रिया सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! दोन नवीन स्थानके सुरू होणार, कधीपासून करता येणार प्रवास? वाचा

Saturday, 21 November 2026, 13:10

दुष्काळ हटू दे; बळीराजा सुखी होऊ दे! कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी एकनाथ शिंदेंचे साकडे; शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन

Saturday, 21 November 2026, 12:53

दौंडमध्ये पोलिसांचे तीन मटका जुगार अड्ड्यांवर छापे, १२ जणांवर गुन्हे दाखल

Saturday, 21 November 2026, 12:43

Daund News: पतीला पोलिसाची नोकरी लागताच मागितला २० लाखांचा हुंडा! पत्नीला नांदविण्यास नकार; पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 12:38

सोनं स्वस्त होतंय, पण शुद्धतेची खात्री नाही? चिनी पावडरच्या भेसळीने बाजारात खळबळ

Saturday, 21 November 2026, 12:18

Loni Kalbhor News: चौघांनी घरात घुसून कुटुंबावर कोयता-दगडाने केला हल्ला; आजी-आजोबासह नातू जखमी

Saturday, 21 November 2026, 12:10
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp