Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये पोलिसांचे तीन मटका जुगार अड्ड्यांवर छापे, १२ जणांवर गुन्हे दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 November 2026, 12:43

दौंड, ता. 21: दौंड शहरात अवैध जुगार आणि मटका व्यवसायाविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मटका आणि तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगाराच्या चिठ्ठ्या आणि इतर साहित्य असा एकूण 36 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या एका गुन्हेगाराने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचे आढळल्याने त्याच्यावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 20) सायंकाळी साडेचार वाजता हॉटेल आवतच्या भिंतीच्या आडोशाला नवनीत सातव हा कल्याण मटका जुगार खेळविताना आढळला. चौकशीत तो मटक्याचे आकडे हद्दपार आरोपी त्यागी रणदिवे याला देत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून 2 हजार 465 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता रेल्वे ग्राउंडजवळील चंदन लॉजच्या भिंतीच्या आडोशाला छापा टाकण्यात आला. यावेळी अमन जाधव याच्यासह सात जण 52 पत्त्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळताना आढळले. या कारवाईत 18 हजार 60 रुपये रोख आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 23 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सायंकाळी साडे सहा वाजता गोवा गल्लीतील पत्राशेडच्या आडोशाला सुरू असलेल्या ऑनलाइन मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. रोहित गायकवाड हा साथीदारांच्या मदतीने रोख पैसे स्वीकारून मटक्याच्या चिठ्ठ्या देत असल्याचे तसेच व्हॉट्सॲपवरून कल्याण व मुंबई मटक्याचे आकडे स्वीकारत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 11 हजार 205 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, सिद्धार्थनगर परिसरात पोलिसांनी हद्दपार आरोपी त्यागी रणदिवे याला ताब्यात रात्री साडेनऊ वाजता घेतले. पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांतून त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. कोणतीही परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या सर्व कारवायांमुळे दौंड शहरातील अवैध मटका आणि जुगार व्यवसाय पुन्हा चर्चेत आला आहे. शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे नेमके कुठे आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दौंड पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंडमध्ये पोलिसांचे तीन मटका जुगार अड्ड्यांवर छापे, १२ जणांवर गुन्हे दाखल

Saturday, 21 November 2026, 12:43

Daund News: पतीला पोलिसाची नोकरी लागताच मागितला २० लाखांचा हुंडा! पत्नीला नांदविण्यास नकार; पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 12:38

सोनं स्वस्त होतंय, पण शुद्धतेची खात्री नाही? चिनी पावडरच्या भेसळीने बाजारात खळबळ

Saturday, 21 November 2026, 12:18

Loni Kalbhor News: चौघांनी घरात घुसून कुटुंबावर कोयता-दगडाने केला हल्ला; आजी-आजोबासह नातू जखमी

Saturday, 21 November 2026, 12:10

Shirur News: हॉस्पिटलसाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याचा तगादा; डॉक्टर पतीकडून डॉक्टर पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढल्याचा आरोप

Saturday, 21 November 2026, 12:05

पुण्यातील बेकायदेशीर करिअर अकॅडमींवर कारवाई करा; शौर्य करिअर अकॅडमीतील हाणामारीच्या घटनेनंतर क्रांती शेतकरी संघ आक्रमक

Saturday, 21 November 2026, 11:29
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp