Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

YCM Hospital :वायसीएम रुग्णालयातील औषधांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह !FDA ची धडक कारवाई; तब्बल 1 कोटी 90 लाखांचा औषधसाठा जप्त..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 November 2026, 14:06

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील सेंट्रल मेडिकल स्टोअरमध्ये देण्यात आलेल्या औषधांचा दर्जा खराब असल्याचे समोर आले आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीत काही औषधे हलक्या दर्जाची सापडली, तर अनेक औषधे योग्य परवानगीशिवाय तयार केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात एफडीएने वायसीएम रुग्णालयातील मेडिकल स्टोअर आणि जेजुरी एमआयडीसीतील औषध कंपनीवर कारवाई केली. या दोन्ही ठिकाणांहून एकूण 1 कोटी 90 लाख 33 हजार 480 रुपये किमतीचा औषधांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. महापालिकेच्या करारानुसार येणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी औषध निरीक्षक एस. एस. बुगाड यांनी सेंट्रल मेडिकल स्टोअरमधून नमुने गोळा केले होते आणि कागदपत्रांची खात्री केली होती.

पुढील वाटप आणि वापर थांबवण्यासाठी औषध निरीक्षक एस. एस. बुगाड यांनी कायद्यानुसार वायसीएम स्टोअरमधील 10 वेगवेगळ्या औषधांचा साठा जप्त केला. या साठ्याची अंदाजे बाजारातील किंमत 1 कोटी 72 लाख 75 हजार 126 रुपये इतकी आहे.

प्रयोगशाळेतील तपासणीत काही औषधे ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ म्हणजेच निकृष्ट दर्जाची ठरली. औषधातील घटकांचे प्रमाण, पाण्यात विरघळण्याचा वेग, गोळ्यांचे किंवा औषधाचे रूप, वजनातील फरक आणि लेबलिंगमध्ये चुका आढळल्या. केअरझिंक, केअरगिल-200, एलडीएलआर-5 आणि डोम्पेरिडोन या औषधांच्या दर्जाबाबतही मोठ्या त्रुटी दिसून आल्या.

तपासात असेही समजले की,जेजुरी एमआयडीसीतील मेसर्स इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीकडे काही औषधे बनवण्याची अधिकृत परवानगी नव्हती. त्यामुळे एफडीएने 29 ऑक्टोबर 2026 रोजी या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली. काही पाकिटांवर ‘केवळ शासकीय पुरवठ्यासाठी’ असे लिहिले होते, तरीही तयार करताना परवानगी आणि दर्जाचे नियम पाळले गेले नाहीत.त्यामुळे आता वायसीएम रुग्णालयातील औषधांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

YCM Hospital :वायसीएम रुग्णालयातील औषधांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह !FDA ची धडक कारवाई; तब्बल 1 कोटी 90 लाखांचा औषधसाठा जप्त..

Saturday, 21 November 2026, 14:06

ना कार्यालय, ना सभागृह! हवेली पंचायत समितीची मासिक सभा थेट सिंहगडावर; जिल्हा परिषदेकडूनही मिळाली मंजुरी

Saturday, 21 November 2026, 14:03

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यातील शेतकऱ्यांना संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Saturday, 21 November 2026, 13:22

हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! दोन नवीन स्थानके सुरू होणार, कधीपासून करता येणार प्रवास? वाचा

Saturday, 21 November 2026, 13:10

दुष्काळ हटू दे; बळीराजा सुखी होऊ दे! कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी एकनाथ शिंदेंचे साकडे; शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन

Saturday, 21 November 2026, 12:53

दौंडमध्ये पोलिसांचे तीन मटका जुगार अड्ड्यांवर छापे, १२ जणांवर गुन्हे दाखल

Saturday, 21 November 2026, 12:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp