Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा! शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गरदरेवाडीत अत्याधुनिक ‘स्टेम लॅब’चे लोकार्पण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 March 2026, 20:54

राहुलकुमार अवचट

दौंड: दौंड तालुक्यातील (Daund News) गरदरेवाडी येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘स्टेम लॅब’चे लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला असून पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या गरदरेवाडी- वडगावबांडे येथील जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्टेम (STEM) लॅब व बहुउद्देशीय सभागृहाचा लोकार्पण सोहळा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला तसेच यावेळी राज्यस्तरीय “गुढीपाडवा पट वाढवा” या अभियानाचा शुभारंभ ही करण्यात आला. (Latest Marathi News)

 

यावेळी बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, “आदर्श आणि स्मार्ट शाळा घडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून दौंड तालुक्यातील गरदरेवाडी वडगाव बांडे शाळेतील आधुनिक सुविधा, स्टेम लॅब आणि प्रगत शैक्षणिक उपक्रम पाहून समाधान वाटले. पुस्तकी ज्ञानासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान ग्रामीण मुलांना मिळणे ही मोठी क्रांती आहे. दौंड तालुक्यात राबवलेला हा शैक्षणिक प्रयोग कौतुकास्पद असून राज्यातील इतर शाळांसाठी तो दिशादर्शक ठरेल अशी भावना देखील व्यक्त केली. यावेळी शिक्षकवृंदाशी संवाद साधत शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांशीही संवाद साधून त्यांच्या शिक्षणाविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांनी जागतिक स्पर्धेत आत्मविश्वासाने उभे राहावे, यासाठी दौंड तालुक्यातील शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. गरदरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उभारलेली ‘स्टेम लॅब’ हे ग्रामीण शाळा ‘हायटेक’ होत असल्याचे उत्तम उदाहरण असून, तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थी आधुनिक शिक्षणाशी जोडला जावा यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार राहुल कुल यांनी केले. ग्रामीण भागातील मुलांच्या सर्जनशीलतेला आणि ‘इनोव्हेशन’ला चालना देण्यासाठी ही लॅब उभारली आहे. शाळेत केवळ शिक्षणच नव्हे, तर खेळ, ध्यानधारणा आणि योग्य आहार यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. सीएसआर (CSR) च्या माध्यमातून आणि लोकसहभागातून तालुक्यातील इतर शाळांमध्येही अशाच प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राहुल कुल यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, उपसंचालक गणपत मोरे, दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांसह तालुक्यातील विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची व स्टेम पाहणी केली व गरदरेवाडीच्या ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
Next Post
Maharashtra Kesari Final: The thrill of 'Double Maharashtra Kesari'! Harshvardhan Sadgir creates history; Nashik's sting in Wagholi soil

Maharashtra Kesari Final: 'महाराष्ट्र केसरी'चा थरार! हर्षवर्धन सदगीर ठरला 'डबल महाराष्ट्र केसरी'; पुण्याच्या मातीत नाशिकचा डंका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.