दौंड : दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बोरा फुड्स प्रा. लिमिटेड या कंपनीच्या सी एस आर फंडातून आणि रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून साडेचार लाख रुपये खर्चून आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण सोयी सुविधासह बांधून देण्यात आले असून बांधकाम केलेल्या शौचालय मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या ताब्यात देण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेतील यापूर्वीच्या शौचालयाची जीर्णावस्थामुळे पडझड व दुरावस्था झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांची खूपच गैरसोय होत होती. हे पाहून बोरा फुड्स कंपनीच्या “टाॅयलेट ब्लॉक प्रकल्प” अंतर्गत आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शौचालयात पाणी व अन्य सुविधा पुरविण्यात आल्या असून यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळेच्या वतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. आनंद केंच यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विविध आजारांपासून दूर राहाण्यासाठी करावयाचे उपाययोजना व स्वच्छतेबाबत काटेकोर पालन करण्याची सूचना केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात सोनचाफा, जांभूळ, गुलमोहर व अन्य वृक्षांची रोपांची रोपण करण्यात आले. यावेळी शाळा समितीच्या अध्यक्षा अंकिता गुळूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष आखाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य गणेश कदम, बोरा फुड्स कंपनीचे सरव्यवस्थापक पंकज शिंगवी, व्यवस्थापक महावीर ललवाणी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा शमिका पवार, पदाधिकारी डॉ. आनंद केंच, रोशन चुंबळकर, सतीश भोपटकर, निर्मला डोंगरे, राजेंद्र भवळकर, परिणीता कुलकर्णी, संतोष घोणे व रोमेशकुमार गुप्ता, शिक्षक लीना डोईफोडे, राणी सुतार यांसह शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी मुख्याध्यापिका अनिता क्षीरसागर यांनी केले तर शिक्षक दादा दरेकर यांनी आभार मानले.