पुणे : जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे, पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुकास्तरीय दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन (2024-25) आयोजित करण्यात आले होते. दौड तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध प्रकल्प सादर केले. खालील विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकल्प आणि नावीन्यपूर्ण कल्पनांसाठी विशेष प्रावीण्य मिळवले:
माध्यमिक विभाग
1. पूर्ती मंजोजी ढाकळे – ऑरगॅनिक पेपर बनविण्याची कल्पना
2. कृष्ण प्रदीप कुडके – प्लास्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर
3. कार्तवी शशिकांत ढवंडी – तरंगते घर (फ्लोटिंग हाउस)
उच्च माध्यमिक विभाग
1. हर्षित सचिन गायकवाड – कचरा व्यवस्थापन
2. ऋचा संजीव गोरे – अपघात प्रतिबंधन (प्रिवेन्शन ऑफ ऍक्सिडेंट)
3. हर्षवर्धन मिकाड पवार – हायड्रोलिक ब्रिजची रचना
इतर यशस्वी विद्यार्थी प्रकल्प:
1. फु. के. बी. – पाण्यापासून टिकाऊ उर्जा निर्माण
2. किं. वाल्हरे आर्य ए एस – साफसफाई व्यवस्थापन व निराकरण
परीक्षकांचे योगदान:
परीक्षकांचे नावे पुढीलप्रमाणे:
1. फडतरे जी. के.
2. कोणे एस. भार
3. गायकवाड एम. डी.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, माजी आमदार रमेश थोरात, जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एम. यू. खरात यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. माजी आमदार थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत त्यांच्या यशाचे कौतुक केले. या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण विचारांना चालना दिली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी विज्ञान, गणित व अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांच्या विकासाला चालना दिली. प्रा. पी. शाळगांवकर आणि प्रा. एम. फाळके यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.