उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील पारूबाई तुळशीराम टिळेकर (वय -९०) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. दुपारी २ वाजता त्यांच्यावर टिळेकरवाडी येथील कैवल्यधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. येथील श्रीदत्त सेवा ट्रस्टचे विश्वस्त बबन तुळशीराम टिळेकर यांच्या मातोश्री तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ बी सी सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष टिळेकर यांच्या त्या चुलती होत.