मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (दि. ११) पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते. उद्या सासवड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा होणार होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाला आहे.
तसेच हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे. याबाबतचे लेखी पत्र देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आले आहे. नव्या तारखेसह हा कार्यक्रम लवकरच पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.