पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाचा 2024 चा बारावीचा निकाल 87.98 टक्के लागला आहे.
यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६.४० टक्के चांगला लागला आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकलं आहे.
सीबीएसई बोर्डात यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सीबीएसई (CBSE) बोर्डाचा इयत्ता 12वी निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.
CBSE बोर्ड निकाल 2024:
– मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी- 91.52
– मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी- 85.12